भरधाव रिक्षाची एसटीला धडक

भरधाव रिक्षाची एसटीला धडक

M88538

भरधाव रिक्षाची एसटीला धडक
उमा टॉकीज चौकात अपघात; रिक्षा चालकासह तिघे जखमी

कोल्हापूर, ता. ६ : भरधाव रिक्षावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रिक्षा समोरून चाललेल्या एसटी बसला धडकली. उमा टॉकीज चौकात आज रात्री बाराच्या सुमारास झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह तिघे जखमी झाले. अपघातात रिक्षा उलटून छताचे मोठे नुकसान झाले. अपघातामुळे मुख्य चौकात बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
रिक्षा चालक अनीस अमिन आगा (वय ३८, रा. सोमवार पेठ) हे आचारी कामही करतात. मुडशिंगी येथे शुक्रवारी एका जेवणावळीचे काम असल्याने तेथील बाजार पोहोच करून रात्री घरी परतत होते, तर पुणे-गारगोटी ही एसटी बस याचवेळी लक्ष्मीपुरीकडून कळंब्याकडे चालली होती. उमा टॉकीज चौकात भरधाव रिक्षावरील आगा यांचे नियंत्रण सुटल्याने त्यांची रिक्षा थेट एसटीच्या बाजूच्या पायऱ्यांजवळ धडकली. यानंतर रिक्षा उलटून छताचा चक्काचूर झाला. अपघातात चालकासह मागे बसलेले दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मुख्य चौकातच हा अपघात झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली.

चौकट
एसटी अपघातांची आठवण
काही वर्षांपूर्वी उमा टॉकीज सिग्नलजवळ भरधाव एसटीवरील चालकाचा ताबा सुटल्याने बसने अनेकांना चिरडले होते, तर यानंतर काही दिवसांतच आणखी एका एसटीचा ब्रेक निकामी झाल्याने ही बस उमा टॉकीजच्या संरक्षक कठड्याला धडकली होती. या दोन्ही अपघातांची चर्चा पुन्हा चौकात सुरू होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com