रंगबेरंगी छत्र्या, रेनकोटसह पावसाळी वस्तूंना मागणी वाढली

रंगबेरंगी छत्र्या, रेनकोटसह पावसाळी वस्तूंना मागणी वाढली

फोटो 88682, 88679

रंगीबेरंगी छत्र्या, रेनकोट खरेदीसाठी लगबग

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ः मृग नक्षत्राची चाहूल लागताच पावसाने हलकीशी झलकही दाखविली. पावसासोबत बाजारात विविध रंगी छत्र्या, रेनकोट या पावसाळी वस्तूंनी बाजारपेठेतील दुकाने गजबजली आहेत. पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लास्टिक पेपर व अन्य साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग आहे.
यंदा हवामान खात्यानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जिल्ह्यात शेतीकामांनाही वेग आला आहे. शाळाही लवकरच सुरू होणार आहेत. त्यासोबत विविध कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या मंडळींनीही छत्र्या किंवा रेनकोटचीही गरज लागते. मागील वर्षीचा रेनकोट यंदा पावसात कितपत टिकेल, याचा अंदाज नसल्याने अनेकांनी नवीन रेनकोट, छत्र्या खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. १०० ते हजारो रुपयांपर्यंत किमतीचे रेनकोट उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या रेनकोटमध्ये कार्टूनची प्रिंट असलेल्या रेनकोटला मागणी अधिक आहे. मुलींमध्ये वनपीस, टूपीस आणि पोन्चोलाही मागणी आहे. खरेदीदारांमध्ये ब्रॅंडेड रेनकोटला सर्वाधिक मागणी आहे. दरानुसार दर्जा असल्याने मध्यम आणि किमान एक पावसाळी हंगाम जाईल, असा रेनकोट खरेदी करण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. तरुणांसाठी पॅन्ट-शर्ट, तर लहानग्यांमध्ये कार्टून, स्पायडरमॅनच्या चित्रांना मागणी आहे.
जुन्या पद्धतीच्या घरावरील कौले झाकण्यासाठी प्लास्टिक कागदाच्या खरेदीलाही वेग आला आहे. दरही अगदी ५ ते साडेदहा रुपये स्क्वेअर फूट असा दर आहे.

चौकट
आगळ्यावेगळ्या छत्र्याही दाखल
नियमित एक घडी असणाऱ्या काळ्या रंगाचे कापड असलेल्या छत्र्यांसोबत आता छत्रीवर पाणी पडताच त्यावरील प्रिंट केलेली पाना फुलांसह कार्टून चित्रांचा रंग बदलणाऱ्या व डोरेमॉन, स्पायडर मॅन, बेन टेन, नोबिता अशा विविध कार्टून्स चित्रे असलेल्या छत्र्यांना मागणी आहे. तरुणांमध्ये हार्ट शेप, विंडो, स्क्वेअर, टू फोल्ड, थ्री फोल्ड, फाइव्ह फोल्ड, ॲटो ओपन, क्लोज, वुईथ टार्च, तर महिलांमध्ये सहजरीत्या पर्समध्ये बसतील अशा छत्र्याही बाजारात आहेत. आजही जुन्या काळातील आजोबांच्या छत्रीला ग्रामीणसह शहरी भागात मागणी अधिक आहे. यामध्ये १६ आणि १२ काडी छत्र्यांना विशेष मागणी आहे. भाजीपाला रेनबो छत्रीही दाखल झाली आहे.

चौकट
खिशाला परवडणारा पोन्चोस रेनकोट
रेनकोटमध्ये शर्ट-पॅन्ट रेनकोटसह वनपीस आणि कुठेही कसाही वापरता येणारा पोन्चू रेनकोटला सर्वाधिक मागणी आहे. विशेषतः दरही १०० रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत आहेत. एकदाच वापरायचा आणि फेकून द्यायचा असाही रेनकोट अगदी चाळीस रुपये किमतीचाही बाजारात आहे.

कोट
बाजारात मागणीप्रमाणे पोन्चोसह नियमित शर्ट-पॅन्ट रेनकोटला मागणी आहे. ग्राहक बजेटप्रमाणे रेनकोट, छत्र्यांची खरेदी करतात. यंदा दरही मागील वर्षाप्रमाणे ‘जैसे थे’च आहेत.
- विजय बेलेकर, छत्र्या, रेनकोट विक्रेते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com