एसटी कॅशलेस तिकीट

एसटी कॅशलेस तिकीट

फाईल फोटो
...
एसटीला ३६ कोटींचा ऑनलाईन महसूल
१४ लाख प्रवासी : डिजिटल पेंमेंटला उदंड प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. ६ : एसटीतून प्रवास करताना सुट्ट्या पैशांमुळे होणारे वाद टाळण्यासाठी तसेच नव्या काळाशी सुसंगत व्यवहार करण्यासाठी एसटी महामंडळाने डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केली आहे. त्यानुसार ॲण्‍ड्रॉईड तिकीट इश्‍श्यू मशिनचा वापर सुरू केला. त्याला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. यात १४ लाख ३२ हजार प्रवाशांनी ऑनलाईन भाडे भरून तिकीट घेतले. यातून एसटी महामंडळाला सुमारे ३६ कोटी ऑनलाईन महसूल मिळाला आहे.
राज्यभरात एसटीतून प्रवास करताना रोख पैशांचा वापर होतो. मात्र, नव्या काळात अनेकजण डिजिटल पेमेंट करण्यास इच्छुक असतात. मात्र, तशी सुविधा एसटी वाहकांकडे नव्हती. परिणामी, अनेकदा वाद होत होते. काही प्रवासी खासगी आराम बसने प्रवास करीत होते. यात एसटीचा प्रवासी वर्ग खासगी वाहतुकीकडे वळला. यात एसटीचेही नुकसान होत होते. अशा अनेक बाबींचा विचार करून एसटी महामंडळाने युपीआय प्रणालीद्वारे तिकीट खरेदीची सुविधा सुरू केली. त्यासाठी सर्व एसटी वाहकांना ॲण्‍ड्रॉईड तिकीट इश्‍श्यू मशिन (ईटीआयएम) नव्याने सेवेत दाखल केले आहेत. या मशिनमुळे प्रवाशांना प्रवासावेळी रोख पैशांऐवजी युपीआय, क्युआरकोड, आदी डिजिटल पेंमेटचा वापर करीत तिकीट काढता येते.
एसटीने फोन पे, गुगल पे, युपीआय पेमेंटची सोय उपलब्ध केली आहे. वाहकांच्या ॲण्‍ड्रॉईड तिकिटांमधील क्युआर कोडद्वारे तिकिटांचे मोजके पैसे प्रवाशांना देता येतात. खिशात रोख पैसे नसल्यास किंवा सुट्ट्या पैशांचे वाद कमी झाले आहेत. या सहजसुलभ तिकीट प्रणालीस प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन तीन हजार ५०० तिकीटे युपीआयमार्फत काढली. मेमध्ये यात पाचपट वाढ झाली. प्रतिदिनी २० हजार ४०० तिकिटे ऑनलाईन पेंमेटवर काढली जात आहेत.
महामंडळाच्या खात्यावर युपीआयद्वारे पैसे जमा होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते जानेवारी २०२४ मध्ये प्रतिदिन दहा लाख होते. सध्या हे प्रमाण ४५ लाख प्रतिदिन असे झाले आहे.
...
चौकट
महिना* तिकीट संख्या* महसूल
जानेवारी २००४* १ लाख ९ हजार ४९६* ३ कोटी १२ लाख
फेब्रुवारी* १ लाख ३३ हजार १५७ * ४ कोटी दहा लाख ७० हजार
मार्च * २ लाख ५ हजार ९६१ * ५ कोटी ८६ लाख ५० हजार
एप्रिल* ३ लाख ५० हजार ७३६* ८ कोटी ७५ लाख २३ हजार
मे* ६ लाख ३२ हजार ६९०* १४ कोटी १ लाख ८२ हजार
एकूण* १४ लाख ३२ हजार* ३५ कोटी ८६ लाख २५ हजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com