गडहिंग्लज आयटीआय प्रवेश सुरु

गडहिंग्लज आयटीआय प्रवेश सुरु

गडहिंग्लज आयटीआय प्रवेश सुरू
३० जूनअखेर मुदत ; ११ कोर्ससाठी २९६ प्रवेशक्षमता
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ७ : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ३० जूनअखेर मुदत आहे. या केंद्रात फिटर, मशिनिष्ट, मोटार मेकॅनिक, टर्नर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, ड्रेस मेकिंग, पंप ऑपरेटर, रेफ्रीजरेशन, मोटर मेकॅनिक अशा ११ कोर्ससाठी २९६ विद्यार्थ्यांची प्रवेशक्षमता आहे. ऑनलाईन पध्दतीने प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. ४ जुलैला कच्ची, तर ७ जुलैला पक्की गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. प्रवेशाच्या यंदाही चार फेऱ्या होणार आहेत.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ३ जूनपासून सुरू झाली. सोमवारी (ता.१०) दहावीच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना शाळेत मिळतील. विद्यार्थ्यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचे आहेत. खुल्या गटाला १५०, तर राखीव प्रवर्गासाठी १०० रुपये अर्जाची किंमत आहे.
प्रवेश क्षमतेच्या ९० टक्के जागा या कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. केंद्रात विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा आहे. अद्ययावत प्रयोगशाळा, अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि अनुभवी शिक्षक ही वैशिष्‍ट्ये आहेत. महिलांसाठी प्रत्येक कोर्सला ३० टक्के जागा राखीव असल्याची माहिती प्राचार्य स्वानंद देवधर यांनी दिली. संकेतस्थळावर ४ जुलैला कच्ची गुणवत्ता यादी जाहीर होईल. यात त्रुटी असल्यास ५ जुलैअखेर हरकत घेता येईल. २ जुलैपर्यंत विविध कोर्स आणि आयटीआयसाठी पसंतीक्रम भरण्याची पहिली फेरी आहे. ७ जुलैला पक्की गुणवत्ता यादी लागेल. १४ जुलैला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची पहिली यादी जाहीर होईल.
-------------------
नवे अभ्यासक्रम पुढीलवर्षी
येथील आयटीआयमध्ये कॉस्मेटिक, प्लंबर, सर्व्हेअर अशा तीन नव्या कोर्सेससाठी मान्यता मिळाली आहे. पदमान्यता मिळाली असून, साहित्य खरेदीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. या नव्या कोर्सेसमुळे ८० प्रवेश क्षमता वाढणार आहे. परिणामी, या केंद्रातील कोर्सेसची संख्या चौदा, तर एकूण प्रवेशक्षमता ३७६ होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com