... तर उमेदवार सतेज पाटील निवडणार

... तर उमेदवार सतेज पाटील निवडणार

... तर उमेदवार सतेज पाटील निवडणार
इचलकरंजी विधानसभा निवडणूक : महाविकास आघाडीतर्फे माहिती
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ७ : इचलकरंजी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येणार आहे. त्यासाठी चर्चेतून उमेदवारांच्या नावावर एकमत केले जाणार आहे. तसे न झाल्यास याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आमदार सतेज पाटील यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती आज आघाडीच्यावतीने पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून अपेक्षेपेक्षा आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना कमी मते पडली. पण, त्यामुळे निराश न होता आघाडीच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्नावर यापुढेही अखंडितपणे लढाई सुरूच ठेवली जाणार आहे, असे यावेळी स्पष्ट केले.
काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, माकपचे भरमा कांबळे, सदा मलाबादे यांनी भूमिका मांडली. सुरुवातीला आघाडीकडून राजू शेट्टी यांचे नाव चर्चेत होते; पण शेवटच्या टप्प्यात सत्यजित पाटील-सरुडकर यांची उमेदवारी निश्चीत झाली. ते इचलकरंजीसाठी फारसे परिचित नव्हते. तरीही आघाडीची एकसंध मोट बाधून आम्ही चांगले वातावरण निर्माण केल्याचे सांगितले.
-----
सुळकूड योजनेची माने यांच्यावर जबाबदारी
गतवेळी धैर्यशील माने इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावर निवडून आले होते. त्यांच्या कालावधीत सुळकूड पाणी योजना मंजूर झाली आहे. पण, ही योजना अद्याप पूर्ण झालेली नाही. आता इचलकरंजीकरांनी पुन्हा एकदा सुळकूड योजनेतून पाणी आणण्याची जबाबदारी खासदार माने यांच्यावर टाकली आहे, असे नमूद करीत यंत्रमाग उद्योगाच्या अतिरिक्त वीज सवलतीचाही प्रश्न त्यांनी मार्गी लावावा, अशी अपेक्षा आघाडीकडून व्यक्त केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com