संक्षिप्त

संक्षिप्त

नर्सिंग प्रवेशाबाबत
आज मार्गदर्शन
कोल्हापूर : येथील कौन्सिल ऑफ एज्युकेशन संस्थेच्या पार्वतीदेवी कुंभार कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये शनिवारी (ता. ९) नर्सिंग प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन दिले जाणार आहे. नर्सिंग अभ्यासक्रमासाठी ‘सीईटी’ची आवश्यकता असते. या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले जाणार आहे. आझाद चौकातील कॉलेजशी विद्यार्थी व पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन कॉलेजने केले आहे.
......
विराज मोहितेसह
आरुष पाटील प्रथम
कोल्हापूर : यंदाच्या एसओएफ ऑलिम्पियाड परीक्षेत येथील तीन विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक पटकावला आहे. शरद किड्समधील विराज मोहिते, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड शाळेतील आरुष पाटील यांनी आंतरराष्ट्रीय इंग्लिश ऑलिम्पियाडमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. जयसिंगपूरच्या सर्वेश कवठेकर याने राष्ट्रीय विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. स्पर्धेत डॉ. डी. वाय. पाटील अकादमीचे शांतिनिकेतन, इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल या शाळांसह जिल्ह्यातील शाळांचा सहभाग होता.
.........
कोल्हापुरात आज
मेगा सर्व्हिस कॅम्प
कोल्हापूर : जावा येझ्दी मोटरसायकल्सच्या वतीने मेगा सर्व्हिस कॅम्पला आजपासून प्रारंभ झाला. उद्याही (शनिवारी) हा कॅम्प सुरू राहणार आहे. २०१९-२०२० मॉडेल्सच्या ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे. सी. एम. व्हील्स (अथर्व आयकॉन, वेस्टसाइड मॉलच्या बाजूला, ताराबाई पार्क) येथे हा कॅम्प सुरू राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com