निधन वृत्त

निधन वृत्त

88745
शिवाजी ढवळे यांचे निधन
कोल्हापूर ः रुईकर कॉलनी येथील शिवाजी ऊर्फ मारुती ज्ञानदेव ढवळे (वय ८३) यांचे निधन झाले. शिस्तप्रिय व कर्तव्यदक्ष तुरुंग अधिकारी म्हणून त्यांची ऐंशीच्या दशकात ओळख होती. नागपूर, कळंबा, आटपाडी जेलमध्ये त्यांनी तुरुंग अधीक्षक म्हणून काम केले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) सकाळी नऊ वाजता आहे.

88753
डॉ. बी. बी. पाटील
कोल्हापूर ः येथील डॉ. बी. बी. पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. महापालिकेचे ते निवृत्त वैद्यकीय अधिकारी होत. त्यांच्या मागे मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) कदमवाडीत आहे.

88717
सुरेश पाटील
कोल्हापूर : कसबा बावडा, पाटील गल्ली येथील सुरेश शंकर पाटील (वय ६३) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

88721
मोहन लाड
कोल्हापूर : शाहूपुरी येथील वृत्तपत्र विक्रेता मोहन गणेश लाड (सोन्या) (वय ३०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ असा परिवार आहे. तो सुजित लाड यांचा चुलत भाऊ होता. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

88739
संजय रानमाळे
कोल्हापूर : वर्षानगर येथील संजय शामराव रानमाळे (वय ५८) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) मांगेवाडी (ता. राधानगरी) येथे आहे.

88743
सुशीला यादव
कोल्हापूर : राजोपाध्येनगर येथील सुशीला दतात्रय जाधव (वय ७९) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

88727
मृणालिनी कुलकर्णी
कोल्हापूर : देवकर पाणंद येथील मृणालिनी मधुकर कुलकर्णी (वय ७१) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुलगे, सून, नातू असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. ८) आहे.

88729
मालती अभ्यंकर
कोल्हापूर : खरी कॉर्नर येथील मालती मधुकर अभ्यंकर (वय ८९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे व परतवंडे असा परिवार आहे.

88733
प्रकाश डब्बे
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील प्रकाश शंकर डब्बे (वय ६८) यांचे निधन झाले. माती सावरणे विधी रविवारी (ता. ९) आहे.

88734
बबुताई कोपार्डेकर
कोल्हापूर : सानेगुरुजी वसाहत येथील बबुताई पांडुरंग कोपार्डेकर (वय ८२) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

88737
सरोजनी गणप
कोल्हापूर : समता कॉलनी, टेंबलाईवाडी येथील सरोजनी चनविरप्पा गणप (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे व मुलगी असा परिवार आहे.

88751
डॉ. गुंडोपंत खाडे
शिरगाव : मुसळवाडी (ता. राधानगरी) येथील डॉ. गुंडोपंत शंकर खाडे (वय ६९) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुली, सून, भाऊ, बहीण असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) सकाळी ९ वा आहे.

02289
सरदार साठे
पोर्ले तर्फ ठाणे : येथील सरदार सदाशिव साठे (वय ५३) यांचे निधन झाले. त्यांच्यामागे आई, पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (ता. ९) आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com