भरड धान्य पुस्तकाचे संकलन अनावरण

भरड धान्य पुस्तकाचे संकलन अनावरण

88710

भरड धान्यांचा उपयोग दैनंदिन
आहारात होणे आवश्यक

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के : ‘मिलेट द नेचर्स क्रॉप’ पुस्तकाचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ८ : ‘‘भरड धान्यांचा उपयोग दैनंदिन आहारामध्ये होणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी केले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहात आयोजित ऑनलाईन बैठकीमध्ये ‘मिलेट द नेचर्स क्रॉप’ पुस्तकाचे अनावरण झाले. या पुस्तकासाठी बहिःस्थ परीक्षक म्हणून परीक्षण केलेले इंडिया मिलेट इनिशिएटिव्हचे अध्यक्ष डॉ. सत्येन यादव ऑनलाईन उपस्थित होते.
अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान अधिविभागातील डॉ. अभिजीत गाताडे, डॉ. प्रवीणकुमार पाटील, हर्षवर्धन कांबळे यांनी पुस्तकाचे संकलन केले. डॉ. शिर्के यांच्या हस्ते पुस्तक ई-बुक फॉर्ममध्ये विद्यापीठाच्या वेबसाईटवर सर्वांसाठी उपलब्ध करून दिले. इंग्रजी भाषेत असलेले पुस्तक मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून देण्याबाबतही डॉ. शिर्के यांनी संबंधितांना सूचना केली.
डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘भरड धान्य पिकांची वैशिष्ठ्य म्हणजे, ही अल्प पावसाच्या परिस्थितीत शुष्क आणि अर्ध-शुष्क भागात वाढतात. या पिकांमध्ये उच्च पौष्टिक मूल्ये असून ती पौष्टिक तृणधान्य म्हणून ओळखली जातात. यापासून विविध आरोग्यवर्धक पदार्थ तयार करता येतात. कोल्हापूर हॉटेल संघटनांनीही भरड धान्याचा समावेश मेनू कार्डमध्ये करण्याचा मानस व्यक्त केला. ई-बुक स्वरूपातील हे पुस्तक सर्वांना उपयोगी ठरेल. येत्या काळात भरडधान्यांवर नवीन संशोधनपर उपक्रम हाती घेऊन तसेच भरडधान्यांवर आधारित असणारे पारंपरिक खाद्यपदार्थांबाबत माहितीचे संकलन करुन भरडधान्यांना भारतात तसेच परदेशातही प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. हे पुस्तक भरडधान्यांबाबत शाश्वत माहिती प्रदान करणारे जेणेकरून भरडधान्यांचे उत्पादन व वापर वाढीस चालना मिळेल, यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.’’
डॉ. यादव यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. गाताडे यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. पाटील यांनी आभार मानले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे, हर्षवर्धन कांबळे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com