‘ऑनलाईन’ नाहीत म्हणून झाला झोल..

‘ऑनलाईन’ नाहीत म्हणून झाला झोल..

पासिंगवेळी होणार प्रत्यक्षात तपासणी

-ऑनलाईन नोंदी नसल्‍याने
‘चेचिस’मध्ये फेरफार;

-परिवहन विभागाकडून
झाडाझडती सुरू

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः तुमचे वाहन २०१६ पूर्वीच्या नोंदीचे असेल तर सतर्क रहा. तुमच्या क्रमांकाचे वाहन इतर ठिकाणी फिरत असण्याची शक्यता आहे. विशेष करून कमर्शियल वाहनांसाठी ही धोक्याची घंटा आहे. ट्रॅव्हलर बसच्या चेसिसमध्ये बदल करून नोंदणी करून मोठा झोल केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. यातून काहींना अटकही झाली आहे. पण, या सर्व वाहनांच्या नोंदी ऑनलाईन नसल्याने ही फसवणूक झाली आहे. आता पासिंग वेळी प्रत्यक्षात तपासणी करण्याचे आदेश निघाले आहेत.
देशातील परिवहन विभाग अपडेट होऊन २०१६ला ऑनलाईन झाला. तत्पूर्वीच्या नोंदी हाताने होत होत्या. त्याचाच फायदा घेऊन चेसिस आणि त्याच्या रजिस्ट्रेशनमध्ये झोल केला आहे. २०१६ नंतरच्या वाहनांच्या नोंदी थेट ऑनलाईन असल्यामुळे देशातील कोणत्याही ठिकणी त्या वाहनांची सविस्तर माहिती मिळते. त्यामुळे अपघात, वाहन चोरीस, कर चुकवेगिरी, नियम भंग याची माहिती एका क्लिकवर मिळते. परिणामी संबंधित चालक-मालकांना कोठे ना कोठे तो दंड भरावा लागतो. मात्र, जी वाहने ऑनलाईन नाहीत त्या वाहनांच्या सविस्तर माहितीसाठी संबंधित कार्यालयाकडे पत्रव्यवहार करावा लागतो. उत्तरासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे कारवाईमध्ये ढिलाई होते.
ट्रॅव्हलर बसेसच्या चेचिसमध्ये फेरफार करून नोंदणी केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला. ‘वन टाईम टॅक्स’ भरलेली बस थांबून असेल तर तिचा चेचीस नंबर वापरून कागदपत्रांत फेरफार करून त्या नंबरवर दुसरीच बस फिरवल्याचे परिवहन कार्यालयातून सांगण्यात आले. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) त्यांच्याकडील सर्व दप्‍तर तपासणी सुरू केली आहे. यामध्ये या सर्व बसेस २०१६ पूर्वी नोंदणी झाल्याचे दिसले आहे.
पूर्वी कंपनीकडून म्यॅन्युअली चेचिस क्रमांक दिले जात होते. त्यामुळे खरा खोटा ओळखणे कठीण होते. तसेच पोलिस आणि परिवहन विभागाकडून ऑनलाईन तपासणीत केवळ वाहनाचा क्रमांक तपासला जातो. तेथे प्रत्यक्षात चेचिसचा नंबर तपासला जात नाही. त्यामुळेही हा झोल झाल्याचे प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक नियंत्रण शाखेच्याही समोर आला नसल्याचे सांगण्यात आले.

कोट
गुन्हा दाखल झाल्यावर संबंधित वाहनांची कागदपत्रे तपासणीचे काम सुरू आहे. गुन्ह्यातील सर्व ट्रॅव्‍हरल बसेस या मराठवाडा, विदर्भातील आहेत. येथून पुढे मोटार वाहन निरीक्षकांच्या तपासणीनंतरच पासिंग करण्याचे आदेश लिपिकांना दिले आहेत. येथे चेचिससह अन्य नोंदीही प्रत्यक्षात पाहिल्या जाणार आहेत. ऑनलाईनची प्रक्रिया केवळ कागदपत्रांसाठी राहणार आहे.
-विजय इंगवले, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी
------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com