डेंगी अळ्या सापडल्या

डेंगी अळ्या सापडल्या

फोटो- 88738

डेंगी डास अळ्यांचे वाढते प्रमाण धोकादायक
घरासह परिसरात स्वच्छता केली नाही तर डंख तीव्र होण्याची भीती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : महापालिकेकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये दररोज विविध भागांतील घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर डेंगीच्या डासांच्या अळ्या सापडत आहेत. आज ४९ घरांत डास अळ्या सापडल्या. त्यामुळे नागरिकांकडून घरातील व घराजवळील स्वच्छता केली नाही, तर डेंगीचा डंख तीव्र होण्याची भीती आहे.
पावसाला सुरूवात झाल्यानंतर आरोग्य विभागाने घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबविली आहे. शुक्रवारी २२०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांत ४९ घरांमध्ये डेंगी डासांच्या अळ्या आढळल्या. शाहूनगर, मातंग वसाहत, दौलतनगर, शास्त्रीनगर, पांजरपोळ, प्रतिभानगर, तोरस्कर चौक, ब्रम्हपुरी, गंगावेश, रुईकर कॉलनी, लोणार वसाहत, टाकाळा, टेंबलाईवाडी, फुलेवाडी, लक्षतीर्थ वसाहत, कारंडे मळा, साळोखे मळा, सोमवार पेठ, नागाळा पार्क, शनिवार पेठ, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, शाहूपुरी, न्यू पॅलेस, पोवार मळा, लक्ष्मीपुरी या परिसरांत तपासणी केली आहे. तपासणीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दररोज डास अळ्या सापडत असल्याने धोका वाढत आहे.

चौकट
हलगर्जीपणाचा मोठा फटका
घरातील पाणी साठवण्याच्या भांड्यात अळ्या सापडत आहेत. त्यातून नागरिकांकडूनच हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातून भविष्यात साथीचा धोका उद्‍भवू शकतो. यासाठी महापालिकेचा कारभारच कारणीभूत आहे. पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याने अनेक नागरिक पाणी साठवून ठेवतात. त्यातच या अळ्या सापडत आहेत. पाणीपुरवठा व्यवस्थित झाल्यास पाणी साठवण्याची गरज भासणार नाही.

चौकट
आठवड्यातून एकदा पाणी साठे रिकामे करा
घरातील, परिसरात असलेली भांडी, टाकी व टाकाऊ वस्तूंमध्ये साठविलेल्या वा साठलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डास तयार होतो. ३ ते ५ किलोमीटर भागामध्ये तो प्रवास करू शकतो. डासाने अंडी घातल्यानंतर अळ्यांचे रुपांतर डासामध्ये होण्यास ८ ते १० दिवस लागतात. त्यांचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी आठवड्यातून एकदा पाणी साठे रिकामे करावेत. दिवसा डास चावू नयेत याची दक्षता घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com