विद्यार्थ्याने स्वकमाईतून आईला घेतली साडी

विद्यार्थ्याने स्वकमाईतून आईला घेतली साडी

फोटो-88755

विद्यार्थ्यांनी स्वकमाईतून आईला घेतली साडी
‘सारथी’तर्फे ‘संगणक शिकता शिकता कमवा’ प्रशिक्षणाचा समारोप

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कोल्हापूर कार्यालयातर्फे घेतलेल्या ‘संगणक शिकता शिकता कमवा’ योजनेच्या प्रशिक्षणात ३४६ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन त्यासोबतच तीन लाख ७९ हजार रुपयांची कमाई केली. यातील विद्यार्थ्यानी स्वकमाईतून आईसाठी साडी घेतली.
‘छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व ३५८ तालुक्यात एमकेसीएलच्या तीन हजार १०० प्रशिक्षण केंद्रा मार्फत विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी नॉन क्रिमिलियर संवर्गातील आहेत. त्यांना प्रशिक्षण वर्गात शिकलेल्या बाबींचा सराव करण्यासाठी ‘सरसेनापती वीर बाजी पासलकर सारथी संगणक शिकता शिकता कमवा’ योजना सुरू केली आहे. यात कोल्हापूर कार्यालयातर्फे छत्रपती महाराणी ताराराणी सभागृहात प्रशिक्षण झाले. ‘सारथी’च्या सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास पाटील, डॉ. जोतीराम पवार, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा प्रवक्ता रंजना पाटील, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन भोईटे आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी शिकलेल्या विविध संगणक ज्ञानाच्या माध्यमातून जनतेची विविध कामे उदा. आधार कार्ड काढणे, पॅनकार्ड काढणे, विविध शासकीय योजनांचे ऑनलाईन फॉर्म भरणे, डीटीपी करणे व त्याबदल्यात योग्य तो मोबदला देणे या उपक्रमांतर्गत समाविष्ट आहे. एप्रिल व मे २०२४ मध्ये या उपक्रमात राज्यात तीन हजार ४०१ विद्यार्थ्यांनी ३८ लाख ६४ हजार ९९५ रुपयांची स्वकमाई केली आहे. यात कोल्हापूर सारथी कार्यालयामार्फत ३४६ प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमार्फत तीन लाख ७९ हजार रूपयांची स्वकमाई झाली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत हे राजमाता जिजाऊ माँसाहेब होत्या. याची आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने सहभागी विद्यार्थ्यांनी स्वकमाईतून आईला साडी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेला आदर्श व संस्कार आचरणात आणला. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपातील काही विद्यार्थ्यांनी आईला साडी भेट दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com