तबला सोलो स्पर्धेचे आयोजन

तबला सोलो स्पर्धेचे आयोजन

शास्त्रीय, सुगम गायनसह सोलो तबला वादन स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर : छत्रपती शाहू जयंतीनिमित्त शनिवारी (ता. २२) शास्त्रीय गायन, सुगम गायन स्पर्धा सकाळी १० वाजता आणि रविवारी (ता. २३) सोलो तबला वादन स्पर्धा सकाळी नऊ वाजता होत आहे. या स्पर्धा भवानी मंडप येथे तुळजा भवानी मंदिरात छत्रपती शाहू संगीत विद्यालयातर्फे घेण्यात येणार आहेत. स्पर्धकांनी आपली नावे १८ जूनपर्यंत छत्रपती शाहू संगीत विद्यालय, भवानी मंडप किंवा जेरे टेलर्स, महाद्वार रोड, कामत हॉटेल शेजारी येथे नोंदवावीत. या स्पर्धांचा निकाल २६ जून रोजी छत्रपती शाहू जयंतीदिवशी भवानी मंडप येथे सायंकाळी सहा वाजता जाहीर होणार आहे. स्पर्धा १६ वर्षांखालील, १६ वर्षांवरील अशा गटांमध्ये होणार आहेत, असे आवाहन संस्थेचे संचालक अरुण जेरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com