रोटरी रोजगार मेळावा

रोटरी रोजगार मेळावा

रोटरी मिडटाउनतर्फे
उद्या रोजगार मेळावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशेटीव्ह ट्रस्टतर्फे सोमवारी (ता. १०) मोफत रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. रोटरी समाज सेवा केंद्र महावीर गार्डन शेजारी नागाळा पार्क येथे सकाळी साडेनऊ वाजता मेळावा सुरू होईल, अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष सिद्धार्थ पाटणकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मेळाव्यात इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, उच्चशिक्षित युवक-युवतींसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. जिल्ह्यातील २५ ते ३० खासगी आस्थापना निमंत्रित केले आहे. त्यांच्या मार्फत कुशल, अकुशल उमेदवारांची मुलाखती तसेच माहिती घेतली जाणार आहे. यातून गरजेनुसार गुणवत्तेनुसार नोकरीची संधी दिली जाणार आहे. रोटरी मिडटाउनचे यंदाचे ५० वे वर्ष आहे. यानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमही राबवले जात आहेत. इक्विटास डेव्हलेपमेंट ट्रस्टतर्फे शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास प्रशिक्षण नोकरी विषयक उपक्रम घेतले जातात. त्यांच्याच सहयोगानेही मेळावा होणार आहे, असेही पाटणकर यांनी सांगितले. यावेळी रोटरी मिडटाऊनचे शरद पाटील, सचिव रितू वायचळ, अनिकेत अष्ठेकर, संग्राम पाटील, संजीव चिपळूणकर, संग्राम पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com