कृती समिती निवेदन

कृती समिती निवेदन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
सार्वत्रिक निवडणुका घ्या
शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे निवेदन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्याबाबत निर्देश द्यावेत, अशी विनंती करणारे निवेदन शहर व जिल्हा नागरी कृती समितीतर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधिशांना पाठवले आहे. याबाबतची माहिती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे यांनी दिली.
प्रत्येक शहराची, जिल्ह्याच्या नागरी प्रश्नाच्या व्यवस्थेचा दैनंदिन कार्यभार पाहण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आहेत. पण, गेल्या साडेचार वर्षांपासून महाराष्ट्रातील असंख्य जिल्हा परिषदा, पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका घेतलेल्या नाहीत. सगळीकडे प्रशासक आहेच. नोकरशाहीला स्थानिक दैनंदिन नागरी प्रश्‍नाविषयी फारशी आस्था नसल्यामुळे नागरी प्रश्‍न व नागरी विकास ठप्प होऊन नागरिकांना गैरसोयीशी सामना करावा लागत आहे. केंद्र व राज्य शासनाला प्रलंबित असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्वरित घेण्याचे आदेश देऊन भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्याचे आपणाकडून प्रयत्न करावेत, असे निवेदनात म्हटले आहे. राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, विनोद डुणूंग, प्रकाश आमते, रमेश पोवार, गिरीश आरेकर आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com