सकाळ एज्युकॉन

सकाळ एज्युकॉन

लोगो- मंगळवारच्या अंकातील बातमीतून
...

कोल्हापुरात शनिवारपासून
‘सकाळ एज्युकेशन महायात्रा’
संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत शैक्षणिक प्रदर्शन : गडहिंग्लजमध्ये बुधवारपासून प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : करिअरची दिशा एक-दोन दिवसांत ठरत नसते. खूप विचार करावा लागतो. मुलांचा कल पाहावा लागतो. त्यासाठी आवश्‍यक महाविद्यालय, तिथल्या सोयी, शैक्षणिक खर्च, पुढच्या संधी या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो. पुढचे पंधरा-वीस दिवस तुम्ही त्यासाठी राखून ठेवले असतील. म्हणूनच येथील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात शनिवार (ता. १५) पासून सलग दोन दिवस संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘सकाळ एज्युकेशन महायात्रा’ या शैक्षणिक प्रदर्शनाला प्रारंभ होणार आहे. दरम्यान, गडहिंग्लजमध्ये आजरा रोडवरील मोहिते फूड कॉर्नर येथे बुधवार (ता. १२) पासून हे प्रदर्शन होणार आहे.
दहावी आणि बारावीची परीक्षा संपली की वेध लागतात, ते महाविद्यालयीन शिक्षणाचे आणि करिअरची नेमकी दिशा ठरविण्याचे. अनेकदा विद्यार्थी-पालकांना महाविद्यालय, करिअर निवडताना कसरत करावी लागते. त्यावेळी गरज असते, योग्य मार्गदर्शनाची. या महत्त्वाच्या टप्प्यावर ‘सकाळ माध्यम समूह’ नेहमीच तुमच्या साथीला उभा राहिला आहे. यंदाही तो उभा आहे. ‘सकाळ एज्युकेशन महायात्रा-२०२४’ या शैक्षणिक प्रदर्शनाच्या निमित्ताने शैक्षणिक मंथन घडणार आहे. विविध शैक्षणिक संस्थांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवायला सुरुवात केली आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्रे होतील. कनिष्ठ महाविद्यालयापासून ते कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमांसाठी येथे माहिती मिळेल.
...
चौकट
एका छताखाली सर्व...
महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर पर्याय; कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, आयटीआय, प्रोफेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, परदेशी शिक्षणाकरिता मार्गदर्शक कन्सल्टन्सी, माहिती-तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांच्या माहितीचे प्रदर्शन असेल. ‘जेईई’, ‘नीट’, ‘सीईटी’ यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही मार्गदर्शन करणाऱ्या शैक्षणिक संस्था सहभागी होऊ शकतात.
...
गुणवंतांचा गुणगौरव,
आकर्षक बक्षिसांची संधी
प्रदर्शनासाठी सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे. त्याशिवाय पार्किंग व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. दहावी व बारावी परीक्षेत सत्तर टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रशस्तिपत्र देऊन प्रदर्शनात गौरवले जाणार आहे. त्याशिवाय प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना लकी ड्रॉमधून आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही मिळणार आहे.
..........
स्टॉल बुकिंगसाठी संपर्क
विविध शैक्षणिक संस्थांना अधिकाधिक विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कोल्हापुरातील प्रदर्शनाच्या स्टॉल बुकिंगसाठी विजय (९९२२४१६०५५) यांच्याशी, तर गडहिंग्लज येथील स्टॉल बुकिंगसाठी अरुण (९८८११२९२२८) यांच्याशी संपर्क साधावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com