रस्त्यांची पाहणी - जयश्री जाधव

रस्त्यांची पाहणी - जयश्री जाधव

88910
कोल्हापूर : शंभर कोटी निधीतील माऊली चौक ते गोखले कॉलेज मार्गावरील रस्त्याच्या कामाची पाहणी शनिवारी आमदार जयश्री जाधव यांनी केली. या वेळी उपस्थित अधिकारी.

रस्त्यांच्या कामाची गती
वाढवा : आमदार जाधव
शंभर कोटी रस्त्यांची केली पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : राज्य सरकारकडून मिळालेल्या १०० कोटी निधीतील प्रमुख पाच रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करा. सर्वच रस्त्यांच्या कामाची गती वाढवा. कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करून वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी केल्या. आमदार जाधव यांनी आज माऊली चौक ते गोखले कॉलेज येथील रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या वेळी महापालिकेचे अधिकारी व ठेकेदार कंपनीचे कर्मचारी यांना त्यांनी सूचना दिल्या.
आमदार जाधव म्हणाल्या, ‘‘१०० कोटी निधीतील रस्त्यांची कामे अत्याधुनिक यांत्रिकरणाच्या साह्याने टिकाऊ, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होणे गरजेचे आहे. या रस्त्यापैकी प्रमुख पाच रस्ते पावसाळ्यापूर्वी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यापैकी चार रस्त्याची काम अशंतः अपूर्ण आहेत. ती कामे त्वरित पूर्ण करावीत. माऊली चौक ते गोखले कॉलेज येथील रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करून पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. या निधीतील उर्वरित अकरा रस्त्यांची कामे बारचार्ट तयार करून वेळेत पूर्ण होतील असे नियोजन करा.’’
यावेळी महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, उपशहर अभियंता आर. के. पाटील, कन्सल्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अविनाश कसबेकर, ठेकेदार कंपनीचे शिवानंद आमने, नागरिक व अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com