आजरा ः लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार वितरण

आजरा ः लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार वितरण

88901
आजरा ः येथे सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांना द. ना. गव्हाणकर पुरस्कार प्रदान करताना डॉ. भारत पाटणकर. यावेळी जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, कॉ. संपत देसाई, शोभाताई कारंडे, मोहनराव देसाई व संजय घाटगे आदी
...
धर्म-जातीचे राजकारण आदिवासी, दलितांनी थांबवले
प्रतिभा शिंदे : आजऱ्यात लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्काराचे वितरण
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ८ ः ‘दहा वर्षांत सत्ताधारी भाजपकडून देशात धर्म व जातीचे राजकारण सुरू होते. सत्ताधाऱ्यांकडून भुक, भीती व भ्रमाचा वापर करून शेतकरी, कामगार व श्रमिकांचे दमन केले गेले. त्याला थांबवण्याचे काम आदिवासी व दलितांनी लोकसभेच्या निवडणुकीत मतपेटीतून केले आहे,’ असे प्रतिपादन लोकसंघर्ष मोर्चांच्या नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांनी केले.
येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते लोकशाहीर द. ना. गव्हाणकर पुरस्कार शिंदे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार समितीचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, उपाध्यक्ष मोहनराव देसाई, जनता बॅंक आजराचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई प्रमुख उपस्थित होते.             
शिंदे म्हणाल्या, ‘नर्मदा आंदोलनातील साथींना हा पुरस्कार समर्पित करत आहे. जल, जंगल व जमिनीवर आदिवासींचा हक्क रहावा. यासाठी लढा दिला. प्रसंगी तुरुंगवास भोगला. पण मागे हटलो नाही.’ डॉ. पाटणकर म्हणाले, ‘गव्हाणकर हे जनतेचे शाहीर होते. शाहीर अमर शेख, गव्हाणकर, अण्णा भाऊ साठेसारखे शाहीर आज दिसत नाही. ’         
यावेळी प्रा. आनंद मेणसे, प्रा. किसनराव कुराडे, स्वाती कोरी, अल्बर्ट डिसोझा, सुधीर देसाई, विद्याधर गुरबे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com