रामोजी राव निधन बातमीत चौकट

रामोजी राव निधन बातमीत चौकट

88947
रामोजी राव

रामोजी राव, ‘जयप्रभा’
अन् मालिकांचे चित्रीकरण
सिनेसृष्टीतील स्मृतींना मिळाला उजाळा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः रामोजी फिल्मसिटीचे संस्थापक रामोजी राव यांनी नव्वदच्या दशकात जयप्रभा स्टुडिओ विकसित करण्याबाबत चर्चा झाली होती. त्यांच्या उपस्थितीत येथे विविध मालिकांच्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला होता. श्री. राव यांनी आयुष्याच्या पडद्यावरून आज कायमची एक्झिट घेतली आणि
या स्मृतींना आज पुन्हा उजाळा मिळाला.
राव यांना येथील जयप्रभा स्टुडिओबद्दल नेहमीच उत्सुकता होती. हैदराबादनंतर मालिकांच्या चित्रीकरणासाठी नेहमीच त्यांनी कोल्हापूरला पसंती दिली. पंचवीस वर्षांपूर्वी जयप्रभा स्टुडिओत त्यांच्या हस्ते ‘दौलत’ या मराठी मालिकेच्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला होता. यानिमित्ताने कोल्हापूरकरांना त्यांचे व्यक्तिमत्त्व जवळून अनुभवता आले होते. ईटीव्ही या मराठी वाहिनीवरील ती पहिलीच मराठी मालिका होती. जयप्रभा स्टुडिओ, लोहिया बंगला, किशाबापूचा मळा आदी लोकेशन्सवरही या मालिकेतील विविध प्रसंगांचे चित्रीकरण झाले होते. वैशिष्ट म्हणजे येथील कुशल तंत्रज्ञांची मोठी फळी पाहून ते भारावून गेले होते. त्यांच्याकडून काही कौशल्ये शिकण्यासाठी त्यांनी काही तंत्रज्ञांना कोल्हापुरात प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले होते. त्याचा मोठा फायदा रामोजी फिल्म सिटी उभारण्यासाठी झाला होता, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार उदय कुलकर्णी, निर्मिती व्यवस्थापक मिलिंद अष्टेकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com