जिल्ह्यात तीन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

जिल्ह्यात तीन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’

2602,88898,04343,88928
...
बहिरेवाडीत ढगफुटीसदृश पाऊस
जिल्ह्यात तीन दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ : हणबरवाडीत रेडकू, दोन शेळ्या ओढ्यातून गेल्या वाहून

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर शुक्रवारी रात्री शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. दुसऱ्या दिवशी शनिवारी रात्रीही पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान खात्याकडून रविवार (ता.९)पासून मंगळवार (ता.११) पर्यंत जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तीन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, पावसाचा विचार करता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व तयारी केली आहे.
...
बहिरेवाडीत पेरण्या गेल्या वाहून
उत्तूरः बहिरेवाडी (ता.आजरा) येथे शनिवारी सायंकाळी ढगफुटीसदृश पाऊस झाला. सुमारे तीन तास पाऊस पडत होता. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात, सोयाबीन, भुईमूग पिकाच्या पेरण्या वाहून गेल्या. यावर्षी मॉन्सूनपूर्व वळीव पाऊस वेळेत दाखल झाला. पावसाने दमदार एन्ट्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. जमिनीत ओलावा येताच शेतकऱ्याने पेरणीला सुरुवात केली. काहींची पिकेसुद्धा जमिनीतून डोके बाहेर काढू लागली. मात्र, शनिवारी अतिवृष्टी झाली. जवळपास तीन तास मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे पावसाने वाहून गेले. ज्या शेतातील बियाणे वाहून गेले, तेथे आता दुबार पेरणी करावी लागणार आहे. याबाबत कृषी सहायक शिवाजी गडकरी व तलाठी एकनाथ मिसाळ यांनी पाहाणी करून वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवणार असल्याचे सांगितले.
...

बेरडवाडीत घरात शिरले पाणी
सेनापती कापशी : आज दुपारी सलग अडीच तास झालेल्या मुसळधार पावसाने ओढ्यांना जोरदार पाणी आले. दोन तास येथील पुलावरून पाणी वाहू लागले. पाण्याच्या जोरदार प्रवाहातून एक रेडकू आणि दोन शेळ्या वाहून गेल्या, तर बेरडवाडी येथील एकाच्या घरात पाणी शिरूर धान्य आणि इतर प्रापंचिक साहित्य त्यात बुडाले.
दुपारी दोनच्या सुमारास हणबरवाडी, बेरडवाडी, तमनाकवाडा आणि कापशी परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे हणबरवाडी ते बेरडवाडी दरम्यान पुलावरून पाणी वाहून लागले. पाण्याच्या या मोठ्या प्रवाहातून बेरडवाडी येथील महादेव नाईक यांचे रेडकू आणि लक्ष्मण गव्हाणे यांच्या दोन शेळ्या वाहून गेल्या. थोड्या वेळानंतर त्यातील एक शेळी जखमी अवस्थेत सापडली, तर येथील मारुती नाईक यांच्या घरात डोंगराकडून आलेले पाणी शिरून धान्य आणि प्रापंचिक साहित्य बुडाले.
...
वस्त्रनगरीस पावसाने झोडपले
इचलकरंजीः शहर व परिसराला शनिवारी सुमारे दोन तास पडणाऱ्या‍ पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसाचा जोर पाहून महावितरण कार्यालयाने खबरदारी घेत अनेक भागांमधील विद्युतपुरवठा खंडित केला होता. अनेक ठिकाणी गटारी तुंबून पावसाचे पाणी मार्गावर आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती, तर काही भागांत पाणी नागरिकांच्या घरामध्ये गेले होते.
...
राधानगरी तालुक्यात दमदार
राशिवडे बुद्रुक : राधानगरी तालुक्यात मृगाच्या पावसाने सलामी दिली. मृग नक्षत्र सुरू होताच पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. काल रात्री साडेअकरापासून तब्बल एक तास मोठाल्या थेंबांचा पाऊस झाला. आज दिवसभर उघडीप होती. सायंकाळी चारनंतर पावसाने दमदार सुरुवात केली. जिरवणीच्या या पावसामुळे पेरणी केलेल्या भात शिवाराचा मोठा फायदा होणार आहे. यासह डोंगरी शेताच्या मशागतीला आता वेग येणार आहे. सायंकाळी चारपासून एकसारखा दमदार पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com