दुधगंगा प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेरनियोजन

दुधगंगा प्रकल्पाच्या पाणी वापराचे फेरनियोजन

दूधगंगा प्रकल्पाच्या
पाणी वापराचे फेरनियोजन
वसुदेव-भुजाई उपसा जलसिंचन योजनेला मिळणार पाणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : दूधगंगा प्रकल्पातील पाणी वापराचे फेरनियोजन करण्याचे आदेश राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाकडून शनिवारी देण्यात आले. त्यानुसार कूर शाखेच्या कालव्यावरील वसुदेव-भुजाई जलसिंचन योजनेला पाणी मिळणार आहे. ही योजना सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी मागणी केली होती.
दूधगंगा नदीवर असणाऱ्या विविध बंधाऱ्यामधून सन १९९९ पासून उपसा सिंचन सुरू आहे. त्यात दरवर्षी वाढ होऊन सद्य:स्थितीत प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रामध्ये दूधगंगा नदीवर उपसा सिंचनद्वारे एकूण १०२३९ हेक्टर सिंचन होत आहे. अशाप्रकारे दूधगंगा प्रकल्पांतर्गत बदललेल्या सिंचन पध्दतीनुसार कालव्यावरील प्रवाही सिंचन २२६२४ हेक्टर, कालव्यावरील उपसा सिंचन योजना १४०८५ हेक्टर, लाभ क्षेत्रातील नदीवरील उपसा सिंचन योजना १०२३९ हेक्टर असे एकूण ४६९४८ हेक्टर इतके क्षेत्र मूळ क्षेत्रात बदल न होता सिंचित होत आहे. त्यामुळे प्रवाही पध्दतीऐवजी उपसाद्वारे क्षेत्र भिजत असल्याने प्रकल्पाच्या पाणी वापरात ०.९४ अ.घ.फु. इतकी बचत होत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार वसुदेव-भुजाई उपसा जलसिंचन योजनेंतर्गत अंदाजे ४१८९ हेक्टर क्षेत्रास अंदाजे ०.९४ अ.घ.फु. पाण्यातून सिंचन करणे शक्य आहे, असे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार हा निर्णय राज्य जलसंपदा विभागाकडून घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com