आजरा तालुक्यात १६ शिक्षकांचे समायोजन

आजरा तालुक्यात १६ शिक्षकांचे समायोजन

आजरा तालुक्यात
१६ शिक्षकांचे समायोजन
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. ९ ः तालुक्यामधील प्राथमिक शाळांतील १६ शिक्षक अतिरिक्त झाले होते. त्यांचे तालुक्यातील विविध शाळांमध्ये समायोजन केले आहे. येथील पंचायत समितीमधील शिक्षण विभागात अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया झाली, अशी माहिती आजरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव यांनी दिली आहे.
तालुक्यात प्राथमिक शाळांची संख्या ११९ आहे. यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळांची संख्या ६३ आहे. सहावी ते आठवीपर्यंतच्या शाळांची संख्या ५६ आहे. शिक्षकांची संख्या ३४५ आहे. मराठी शाळांची पटसंख्या दरवर्षी कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे. कमी झालेला जननदर व शहराकडे नोकरी व व्यवसायासाठी स्थलांतरित होणारी लोकसंख्या यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांचा पट दरवर्षी कमी होत आहे. यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२२-२३ मध्ये तालुक्यात १६ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. यामध्ये पदवीधर ३ व अध्यापक १३ शिक्षक अतिरिक्त झाले. तालुक्यातील विविध शाळांमध्ये त्यांचे समायोजन केले आहे. येथील पंचायत समितीमध्ये अतिरिक्त शिक्षक समायोजन प्रक्रिया झाली. आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी, शिक्षक संघटनांचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया झाली.
-------------
दोन शाळा बंद
शून्य पट झाल्यामुळे आजरा तालुक्यातील दोन प्राथमिक शाळांना कुलूप लागले आहे. हारुर व दाभेवाडी येथील चौथीपर्यंतच्या शाळेचा पट शून्य झाला आहे. त्यामुळे या दोन शाळा गतवर्षांपासून बंद झाल्या आहेत. तालुक्यात १२१ प्राथमिक शाळा होत्या. त्यामध्ये घसरण होऊन ११९ राहिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com