मिरचीचा ठसका अन् कांद्याने डोळ्यात पाणी आणले

मिरचीचा ठसका अन् कांद्याने डोळ्यात पाणी आणले

89044

टोमॅटोला लाली, मिरचीचा झटका
कांद्याच्या भावात १० ते १५ रूपये वाढ; पालेभाज्या दर चढेच

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः पावसाचेही आगमन होताच टोमॅटोचे दर साठीपार, तर मिरचीचा झटका एकशेवीस आणि कांद्याने तिशी पार केली आहे. विशेष म्हणजे टोमॅटोने आठवड्यात दुप्पट भाव घेतला आहे. काही दिवसांपासून त्याला भाव नसल्याने उत्पादक शेतकऱ्यांत चिंतेचा सूर होता. कांद्याचे भाव २० ते २५ रूपये किलो असे होते. त्याचेही दर दहा ते पंधरा रूपयांनी वाढले आहेत. पालेभाज्यांची आवक थंडावल्याने दर चढेच राहिले आहेत. त्यामुळे बाजारात उत्साह नाही.
जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी लावली आहे. मात्र, टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी काही महिन्यांचा अनुभव बघता उत्पादनात हात आखडता घेतला आहे. त्यामुळे घाऊक बाजारात टोमॅटो ४० रूपये किलोवर गेला आहे, तर किरकोळ बाजारात हाच भाव ५० ते ६० रूपयांवर पोहचला आहे. पालेभाज्यांमध्ये मेथी २५ रूपये, तर पोकळा १५ ते २० रूपये,पालक १५ ते २० रूपयांवर आणि कोथिंबीराचा पेंडीचा भाव अजूनही पन्नाशीत आहे.

चौकट
पालेभाज्याचे दर
मेथी पेंडी*२५ ते ३० रू.
पोकळा*१५ ते २० रू.
शेपू *२० रू.
अंबाडी*१० रू
पालक*१५ ते १० रू.
तांदळी*१० रू
शेवगा* ५ ते १० रू
लाल माट*१० ते १५ रू
अळू* ५ ते १० रू. पेंडी,
कांदापात *२० रू
कोथिंबीर *५० ते ६० रू
.......
चौकट
फळभाज्यांचे किलोचे दर
गवार*१०० ते १२० रू.
भेंडी*६० रू
वरणा*१२० रू
बिनीस*१२० ते १४० रू
हिरवी मिरची* १२० ते १४० रू
शेवगा*१० ते २० रू
ढबू*८० रू
हिरवा वाटाणा *८० रू
दोडका *६० रू
घेवडा *६० रू
काकडी* ६० रू
फ्लॉवर*२० ते ४० रू. नग
कोबी*२० ते ३० रू, नग
भोपळा फोड*२० रू
दुधी भोपळा* १५ ते२५ रू. नग
लिंबू *१० रू. चार नग
कांदा* ३० ते ४० रू किलो
बटाटा*३० ते ४० रू. किलो
........
चौकट
फळांचे किलोचे दर
तोतापुरी*१० ते २५ रू. नग
सफरचंद*१८० ते ३०० रू
डाळींब *१०० ते २०० रू
द्राक्षे*८० ते १०० रू
संत्री* १०० ते १४० रू
चिकू*५० ते ६० रू
ड्रॅगन फ्रुट*१०० ते १२० रू किलो
केळी (जवारी )* ४० ते ६० रू. डझन
केळी ( वसई)* २० ते ५० रू. डझन
------
चौकट
खाद्यतेलाचे किलोचे दर
शेंगतेल*२०४ रू.
सरकी *११६ रू.
सूर्यफुल *१२० रू
सोयाबीन*११०
खोबरे तेल* २४० रू
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com