बकालीकरणाविरोधात आंदोलन

बकालीकरणाविरोधात आंदोलन

शहराचे बकालीकरण करणाऱ्या
प्रशासनाविरुद्ध मंगळवारी आंदोलन

कोल्हापूर, ता. ९ : शहराच्या बकालीकरणास अकार्यक्षम आणि बेजबाबदार महापालिका प्रशासन जबाबदार आहे. त्याविरोधात मंगळवारी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषणाने जनआंदोलनाला सुरुवात केली जाणार असल्याचे पत्रक माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, शहरात समस्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. प्रशासकराजमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. बकालीकरण सुरू आहे. १५ दिवसांत समस्यांचे निराकरण न झाल्यास आणि बकालीकरण न थांबल्यास नागरिकांच्या साथीने जनआंदोलन करण्याचा इशारा दिला होता. प्रशासनाने काही पावले उचलली नसल्याने आंदोलन सुरू केले जात आहे. थेट पाईपलाइनचे पाणी दोन महिन्यांपूर्वी येऊनही कोणत्या ना कोणत्या भागात पाण्यासाठी आंदोलने होत आहेत. वांगी बोळ, देशपांडे गल्ली, पोतनीस बोळ, मिरजकर तिकटी या मध्यवर्ती परिसरात, काही उपनगरात पाणीपुरवठ्याच्या समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. गटार, छोटे चॅनेल, नाले गाळाने भरले आहेत. इस्टेट, परवाना विभागाच्या अनागोंदीमुळे अतिक्रमणे, टपऱ्या, बेकायदेशीर यात्री निवासांचे पेव फुटले आहे. जवळजवळ ३०० च्या आसपास बेकायदेशीर यात्री निवास असल्याचा अंदाज आहे. परिणामी, महापालिकेची व्यवस्था अजगरासारखी सुस्त झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com