रस्त्यांवर खड्डे

रस्त्यांवर खड्डे

89051

कळंबा साईमंदिर-फुलेवाडी रिंगरोडवर खड्डे
कोल्हापूर, ता. ९ : पावसाला अजून जोरदार सुरुवात झालेली नसताना कळंबा साईमंदिर ते फुलेवाडी रिंगरोडवर खड्डे वाढत आहेत. त्यातील अनेक खड्ड्यांचे पॅचवर्क केलेले नसल्याने पावसात रस्त्याची अवस्था आणखी खराब होणार आहे.
या रिंगरोडवर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील कळंबा साई मंदिर ते नवीन वाशी नाका या रिंगरोडवर गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात खड्डे पडले होते. त्याचे तात्पुरते खडीकरण केले. पण, पॅचवर्क नसल्याने पुन्हा खड्डे पडत आहेत. या रस्त्यावर पावसाचे पाणी वाहत राहते. त्यामुळे चिव्याच्या बाजाराजवळ हा रस्ता पाणंद बनतो. त्यासाठी आताच पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे. बोंद्रेनगर ते फुलेवाडी रिंग रोडवरही भोगम पार्क चौकात खड्ड्यांचे साम्राज्य वाढत आहे. दररोज काही वाहनधारक खड्ड्यांमुळे पडत आहेत. यामुळे पावसाचा जोर वाढल्यानंतर पाणी साचून खड्डे मोठे होणार आहेत. हा रस्ता शंभर कोटींच्या प्रकल्पात केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com