अंबाबाई गर्दी आढावा

अंबाबाई गर्दी आढावा

फोटो 89109

श्री अंबाबाई चरणी २९ लाख भाविक
उन्हाळी सुटीतील चित्र ः शहरासह जिल्ह्यात पर्यटकांची मांदियाळी


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ ः यंदाच्या उन्हाळी पर्यटन हंगामात तब्बल २९ लाख ६० हजार ६१० भाविक करवीर निवासिनी श्री अंबाबाई चरणी नतमस्तक झाले. एप्रिल ते आतापर्यंतची ही आकडेवारी असून, दरदिवशी भाविकांची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दरवर्षीच्या उन्हाळी पर्यटनात राज्यासह कर्नाटक, गोवा राज्यातील पर्यटक कोल्हापूर दर्शनाला पसंती देतात.
दरम्यान, उन्हाळी सुटीतील शेवटचा रविवार असल्याने अंबाबाई दर्शनासह पर्यटनासाठी आलेल्या भाविक-पर्यटकांच्या मांदियाळीने जिल्हा बहरला. पर्यटन व्यवसायातून जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोट्यवधीची उलाढाल झाली. रविवारी गर्दीमुळे शहरातील बहुसंख्य रस्ते गजबजले, तर शहरातील बहुतांश उद्याने बलचमूंनी गजबजली. सायंकाळी उन्हं खाली झाल्यानंतर रंकाळा, महावीर उद्यान अशा बागांमध्ये स्थानिकांसह पर्यटकांनी मोठी गर्दी केली. कोल्हापुरात दाखल झालेल्या पावसाने आज दिवसभर उसंत घेतल्याने पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता आला.
सलग शासकीय सुट्या, तसेच शाळा, महाविद्यालयांच्या सुटीमुळे मोठ्या संख्येने भाविक, पर्यटक आल्याने शहर गर्दीने बहरले. साडेतीन पीठांपैकी एक असणाऱ्या अंबाबाईच्या दर्शनासाठी पर्यटक, भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात येत आहेत. उन्हाळी सुटी लागल्यापासून शहरात अंबाबाई दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावत आहेत. सुटी संपत आल्याने रविवारी शहरात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली. अंबाबाई दर्शनासाठी मंदिरासह परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. महाद्वार, शिवाजी रोड, बिंदू चौक, राजारामपुरी, स्टेशन रोड आदींसह शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर मोठी वर्दळ होती. महाद्वार रोडसह विविध भागांतील विविध दुकानांत खरेदीसाठी गर्दी झाली होती.
----------
ग्राफ करावा
दर्शनासाठी आलेले भाविक
एप्रिल- ८, ९९, ४२९
मे- १५, ५९, ०७६
९ जूनपर्यंत- ५, ०२, १०५
-----------
एकूण २९,६०,६१०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com