सायको मॅट्रिक टेस्ट संपन्न

सायको मॅट्रिक टेस्ट संपन्न

89111
कोल्हापूर ः सायको मॅट्रिक टेस्टमध्ये सहभागी विद्यार्थी.

शंभरहून अधिक विद्यार्थ्यांची
मोफत सायको मॅट्रिक टेस्ट
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः समिधा प्रतिष्ठान आणि योगदान फाउंडेशन यांच्यातर्फे बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व शिक्षणक्रमातील विद्यार्थ्यांसाठी सायको मॅट्रिक टेस्ट घेण्यात आली. प्रायव्हेट हायस्कूल येथे झालेल्या निःशुल्क असलेल्या या टेस्टचा १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
विद्यार्थ्यांनी योग्य शैक्षणिक उपक्रम निवडणे आणि त्या अनुषंगाने नंतर योग्य व्यवसाय किंवा नोकरी निवडणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. अनेक वेळा चुकीचे अभ्यासक्रम निवडल्यामुळे मुलांचे शिक्षण अर्धवट राहते किंवा त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे यश मिळत नाही. यासाठी त्यांच्या मानसिकतेच्या दृष्टीने त्याचे मूल्यांकन व्हावे आणि त्याला योग्य अभ्यासक्रम निवडण्यास मदत व्हावी, यासाठी विविध प्रकारच्या सायको मॅट्रिक टेस्ट उपलब्ध झाल्या आहेत; परंतु सर्वच विद्यार्थ्यांना याबाबत माहितीही नसते. अशा विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. सुजय खाडिलकर यांनी बौद्धिक संपदा कायद्यानुसार (पेटंट) नोंदणीकृत केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे ही चाचणी पार पडली. अजित ठाणेकर यांनी स्वागत केले. विजयसिंह खाडे, उदय सांगवडेकर, अभिजित रेणावीकर, ओंकार गोसावी, ऋतुराज नढाळे, युवराज सुतार उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com