कचरावेचकांची निदर्शने

कचरावेचकांची निदर्शने

89225
कोल्हापूर : महापालिकेच्या प्रवेशद्वारात कचरावेचक महिलांनी कचऱ्याची बोचकी घेऊन निदर्शने केली.

कचरावेचक महिलांची
पालिकेच्या दारात निदर्शने
प्रवेशद्वार अडविले; कचरावेचकांना सामावून घेण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणच्या ओला व सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या कामात कचरावेचकांना सामावून घ्यावे, यासह अन्य मागण्यांसाठी आज कचरावेचक महिलांनी महापालिकेच्या दारात कचऱ्यासह निदर्शने केली. जोरदार घोषणाबाजी करत प्रवेशद्वार अडविले. त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला.
वसुधा कचरावेचक महिला संघटना, कचरावेचक महिला सहकारी बहुउद्देशीय संस्था, एकटी संस्था यांच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत रॅली काढण्यात आली. कचऱ्याने भरलेला टेम्पो तसेच डोक्यावर कचऱ्याची बोचकी घेऊन ‘आम्ही पर्यावरणाचे रक्षण करतो, आम्ही रस्त्यावरील प्लास्टिक गोळा करतो’ अशा घोषणा देत कचरावेचक महिला महापालिकेच्या दारात आल्या. प्रवेशद्वारातच कचऱ्याचा टेम्पो उभा केला व निदर्शने सुरू केली. वारंवार मागण्या करूनही सरकार दुर्लक्ष करत आहे. या महिलांना कचरा वर्गीकरणाच्या कामात सामावून घेण्याच्या मागणीवर कार्यवाही केली जावी, अशी मागणी केली. त्याचा गांभीर्याने विचार केला नाही, तर पावसाळी अधिवेशनाच्या काळात मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही दिला.
याबाबतचे निवेदन पालिका आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. निदर्शनामध्ये आक्काताई गोसावी, भारती कोळी, लक्ष्मी कांबळे, राजश्री नाईक, वंदना शिंदे, संगीता लोखंडे आदी सहभागी झाल्या होत्या.
--------------
चौकट
मागण्या अशा...
निवेदनात कचरावेचकांना सुविधा दिल्या जाव्यात, ओळखपत्र व आरोग्यकार्ड द्यावे, शहरामध्ये वॉर्डनिहाय कचरा संकलन केंद्र सुरू करावे, घनकचरा व्यवस्थापन कायद्याच्या अंमलबजावणीस सुरुवात करावी, समाजकल्याण विभागाने कचरावेचकांच्या मुलांना शिष्यवृत्ती वेळेत द्यावी, कचरावेचकांची नोंदणी व्हावी, गणना करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com