‘कुस्ती पंढरी’त वसतिगृहाअभावी मल्लांची फरफट

‘कुस्ती पंढरी’त वसतिगृहाअभावी मल्लांची फरफट

पैलवानांचा संग्रहित फोटो वापरावा...
.............
‘कुस्ती पंढरी’त वसतिगृहाअभावी मल्लांची फरफट

बदलत्या काळाबरोबर कुस्तीचे आधुनिकीकरण होण्याची गरज

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा 
कोल्हापूर, ता. १० : कुस्ती आणि कोल्हापूर हे एक समीकरणच बनले आहे. मात्र, ‘कुस्ती पंढरी’ असणाऱ्या कोल्हापुरात कुस्तीसाठी आवश्यक आधुनिक सुविधांसह वसतिगृहाअभावी मल्लांची फरफट होत आहे. त्यामुळे येथे प्राथमिक धडे येथे गिरवून राज्यासह देशातील अन्य ठिकाणी मल्ल जात आहेत. त्यांनी असे न करता येथेच करिअर करावे, यासाठी हे चित्र बदलण्यासाठी शासनाने बदलत्या काळानुसार कुस्तीचे आधुनिकीकरण होण्याबरोबरच वसतिगृहाची सोय करणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे.
कुस्ती हा कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला रांगडा खेळ. देश-विदेशातील मल्लांनाही इथल्या तालमींचे आकर्षण आहे. याच तालमींनी कोल्हापूरची कुस्ती आजतागायत जिवंत ठेवली आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांची मुले कुस्तीत करिअर करायचे स्वप्न बाळगून येथील तालमीत येतात. अपार मेहनत घेऊन काही मैदानांमध्ये स्वतःला सिद्ध करतात. मात्र, जेव्हा मोठ्या स्पर्धांची वेळ येते, तेव्हा मात्र पदरी निराशा येते. मग हेच मल्ल हेरून बाहेरचे प्रशिक्षक व संस्था त्यांना आपल्याकडे सामावून घेतात. तेथे मिळणारे प्रशिक्षण व सुविधा हे अधिक चांगले असल्यामुळे हे मल्लही तेथेच रमतात.   
तालीम संस्थांमध्ये मल्लांना राहण्याची व्यवस्था असते. ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वच मुलांची परिस्थिती चांगली नसते. त्यामुळे ते स्वतंत्र भाड्याच्या खोलीत न राहता तालमीतच राहतात. मात्र, तालमीतील व्यवस्था तोकडी पडते. कुस्तीचा दर्जा उंचावण्यासाठी वसतिगृहाची आवश्यकता आहे. उच्चदर्जाचे प्रशिक्षण व स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही वसतिगृहे महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. यामुळे येथील कुस्तीपटूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी होण्याची क्षमता वाढेल.
तालीम परिसरामध्ये असणारी सुविधा सध्या कालबाह्य झाली आहे. यामुळे ५० वर्षांहूनही अधिक काळ जुन्या पद्धतीचा वापर रहिवासासाठी केला जातो. यासह परराज्यांतूनही अनेक मल्ल कोल्हापुरात कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी येतात. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे मल्ल वैयक्तिक खोली घेऊन राहतात. जर याठिकाणी वसतिगृह झाले तर याचा फायदा स्थानिक सह बाहेरून येणाऱ्या मल्लांना होईल 
...
विदेशातील मल्लांनाही कुस्तीची भुरळ
कोल्हापुरात अनेक मल्ल कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी येतात. विदेशातील मल्लांनाही येथील कुस्तीची भुरळ आहे, असे असताना या मल्लांसाठी राहण्याची व्यवस्था असणे महत्त्वाची बाब आहे. यामध्ये स्वतंत्र भोजन कक्ष, स्वच्छतागृह, निटनेटकी निवास व्यवस्था आवश्यक आहे.
...
मंत्र्यांची आश्वासने, लोकवर्गणीतूनचे स्वप्न
२०१९ मध्ये लोकवर्गणीतून वसतिगृह उभारण्याचा विचार समोर आला होता. मात्र, पाच वर्षे उलटली तरी याला अद्याप याला मूर्तरूप प्राप्त झाले नाही आहे. जानेवारी २०२४ मध्ये येथील गंगावेश तालमीला मंत्र्यांनी भेट देऊन तालमीची डागडुजी व वसतिगृह उभारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मात्र, त्यालाही पाच महिने उलटले असून, यासाठीची कागदपत्रेही टेबलावरून हलली नाहीत.
......
कोट 
जगभरात कोल्हापूरची ओळख ‘कुस्ती पंढरी’ अशी आहे. हा वारसा जपणे महत्त्वाचे आहे. याचा विकास करण्याची सर्वतोपरी जबाबदारी आमची आहे. यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू असून, येणाऱ्या काळात कुस्तीसाठी महत्त्वाची कामे पूर्ण होतील.   
- व्ही. बी. पाटील, जिल्हाध्यक्ष. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ
०००००००००००००००००००००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com