फलक लागले

फलक लागले

फोटो 89247

आता कशी वाजली घंटी.....
फलक चर्चेत ः मुख्यमंत्री शिंदे यांना दिले प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः ‘सुजल्यावर कळतंय, मारलंय कुठं’ अशा आशयाच्या फलकानंतर दाभोळकर कॉर्नरला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलेले ‘आता कशी वाजली घंटी’ या आशयाचा फलक चर्चेचा विषय बनला आहे. यातून कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाचा प्रत्युत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर संपूर्ण राज्यातच डिजिटल फलकांच्या माध्यमातून एकमेकांची टर उडवली जात आहे. त्याला कोल्हापूरही अपवाद राहिलेले नाही. किंबहुना कोल्हापुरात एखादा फलक झळकला तर त्याची चर्चाही महाराष्ट्रभर होत आहे. अशाच एका फलकाची चर्चा दोन दिवसांपूर्वी झाली. त्यावर ‘सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं’ असा मजकूर होता. अज्ञाताने लावलेला हा फलक पोलिसांनी काढला. परंतु, त्याची चर्चा मात्र चांगलीच रंगली. हीच चर्चा कायम असताना आता मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दाभोळकर कार्नरवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावलेला फलक चर्चेचा विषय ठरला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांनी सलग दोन-तीन दिवस कोल्हापुरातच तळ ठोकला होता. शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचाराची सांगता भव्य रॅलीने झाली. या रॅलीत बोलताना कार्यकर्त्यांनी शिंदे यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावर बोलण्यास सांगितले. त्यावर शिंदे यांनी ‘बंटी आता घंटी वाजव’ अशा शब्दात पाटील यांच्यवर टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून या कार्यकर्त्यांनी प्रा. मंडलिक यांच्या पराभवानंतर ‘आता कशी वाजली घंटी..’ असा मजकूर लिहिलेला फलक लावून थेट शिंदे यांनाच प्रत्युत्तर दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com