कराडचा रोहित मिश्रा, गडहिंग्लजची भक्ती पोटे प्रथम

कराडचा रोहित मिश्रा, गडहिंग्लजची भक्ती पोटे प्रथम

89373
पारगड ः मॅरेथॉन स्पर्धेचे उद्‍घाटन करताना आमदार राजेश पाटील. शेजारी कान्होबा माळवे, बिपीन चिरमुरे आदी.
..........
कराडचा रोहित मिश्रा, गडहिंग्लजची भक्ती पोटे प्रथम

पारगड हेरिटेज रन ः सहाशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ११ ः किल्ले पारगड (ता. चंदगड) येथे झालेल्या ‘पारगड हेरिटेज रन मॅरेथॉन’ स्पर्धेत २१ किलो मीटरमध्ये पुरुष विभागात कराडचा रोहित मिश्रा, तर महिला गटात गडहिंग्लजच्या भक्ती पोटे यांनी विजेतेपद पटकावले. सहाशेहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धा झाल्या. विजेत्यांना आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
‘एक धाव निसर्गासाठी’ हे ब्रीद घेऊन पारगड जनकल्याण संस्था मुंबई व ग्रुप ग्रामपंचायत मिरवेल यांच्या वतीने गेली काही वर्षे ही स्पर्धा घेतली जाते. या वर्षी स्पर्धेचे उद्‍घाटन आमदार राजेश पाटील, बिपीन चिरमुरे, कान्होबा माळवे यांच्या हस्ते झाले. पावसाच्या धारा अंगावर झेलत जंगलातून धावण्याचा थरार स्पर्धकांनी अनुभवला. २१, १० व ५ किलोमीटर अशा तीन प्रकारांत पुरुष व महिला गटात स्पर्धा झाल्या.
२१ किलोमीटरमध्ये पुरुष गटात रोहित मिश्रा (कराड), शुभम पाटील (हालेवाडी), देवबा देसाई (सावंतवाडी), तर महिला गटात भक्ती पोटे (गडहिंग्लज) या एकाच महिलेचा समावेश होता. तिने एकटीने सर्व अंतर पार केले. १० किलो मीटरमध्ये पुरुष गटात पृथ्वीराज कांबळे (महागाव), शिवराज घोलराखे (भडगाव), सूरज कांबळे (जंगमहट्टी), तर महिला गटात वंदना गोरुले (महागाव), जान्हवी मोहनगेकर (किणी), क्रांती वेताळ (कल्लेहोळ, जि. बेळगाव) यांनी क्रमांक पटकावले. ५ किलोमीटरसाठी पुरुष गटात बाबू गावडे (सोनारवाडी), सूरज भालेकर (लातूर), शिवम कोपर्डे (बेळगाव), तर महिला गटात वेदांती मणगुतकर (किणी), सुरभी चव्हाण (विंझणे), शांभवी जाधव (विंझणे) यांनी विजेतेपद पटकावले. याशिवाय पाच किलोमीटर सब ज्युनिअर गटात तुषार पडवळे (विंझणे), जय मोहनगेकर (किणी), आयुष कंग्राळकर (बेळगाव), भक्ती गुरव (बेळगाव), आराध्या हलगेकर (यळ्ळूर), अक्षता हलगेकर (यळ्ळूर) यांनी क्रमांक पटकावले.
आमदार राजेश पाटील, चिरमुरे, माळवे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण झाले. यावेळी सुनील मालुसरे, रघुवीर शेलार, विठ्ठल शिंदे, पी. जे. मोहनगेकर, सरपंच तुकाराम सुतार, नारायण गडकरी, शांताराम आडाव, प्रकाश चिरमुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्रीकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com