महापालिकेसमोर उपोषण

महापालिकेसमोर उपोषण

89385
कोल्हापूर : भाजपच्या माजी नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाविरोधात लाक्षणिक उपोषण केले.


पालिकेच्या अनागोंदीविरोधात
माजी नगरसेवकांचे उपोषण
पाणी, रस्तेप्रश्‍नी वेधले प्रशासनाचे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ : ‘शहराचे बकालीकरण करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो’, ‘पाणीपुरवठ्याचा बट्ट्याबोळ करणाऱ्या प्रशासनाचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत महापालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात माजी नगरसेवकांनी महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण केले.
आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून पुढील आठवड्यात एक दिवस नागरिकांच्या समस्या व कोल्हापूरच्या विकासाच्या सूचना एकत्रित करण्यात येणार असल्याचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी सांगितले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरी सुविधांची दुर्दशा झाली आहे. पाणी, आरोग्य, रस्ते, पथदिवे या गरजांकडे अधिकारी लक्ष देत नाहीत. थेट पाईपलाईन होऊनही विविध भागांत पाणीपुरवठा खंडित होतो. पाण्यासाठी आंदोलने होत आहेत. बावड्यातील महिलांनी रास्ता रोको आंदोलन केले. मोठ्या प्रमाणावर निधी येऊन रस्त्यांची कामे उशिरा सुरू झाल्याने पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांमधून वाटचाल करावी लागणार आहे. गॅस पाईपलाईनसाठी झालेल्या खोदाईचे पॅचवर्क ठेकेदारांनी पूर्ण न केल्याने उपनगरात रस्ते चिखलाने भरणार आहेत. नगररचना विभागाने अनधिकृत बांधकामे काढून घेण्याच्या नोटीस देऊन कोणतीही कारवाई न केल्यामुळे अतिक्रमणे वाढलेली आहेत. मुख्य रस्ते, वर्दळीच्या ठिकाणी अनधिकृत टपऱ्यांमुळे शहर बकाल होत आहे. या समस्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन दाखवल्या आहेत. तरीही प्रशासन दखल घेत नाही. प्रशासनाला जाग आणण्यासाठी जनआंदोलनाची सुरुवात म्हणून आज ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, रूपाराणी निकम यांनी लाक्षणिक उपोषण केले. यामध्ये ओंकार गोसावी, पारस पालीचा, हर्षांक हरळीकर, विशाल शिराळकर, अमेय भालकर, सुनील पाटील, योगेश कांगटणी, रश्मी साळुंखे, प्रसाद नरुले, संतोष जोशी सहभागी होते. तर बाबा वाघापूरकर, प्रताप देसाई, मानसिंग पोवार, राजू मोरे, सूरज धनवडे, जहीद शेख, प्रकाश आमटे, संदीप मिरजकर, योगेश आठले, कोडोलीकर, श्रीकांत लिमये यांनी भेट देऊन सहमती नोंदविली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com