भारात पाटील पत्रपरीषद

भारात पाटील पत्रपरीषद

‘बाजार समिती’ला २.८२ कोटींचे
उत्पन्न : भारत पाटील
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर , ता. ११ ः शेती उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नात चालू वर्षात २ कोटी ८२ लाखांचे उत्पन्न वाढले आहे. त्यानुसार समितीने १८ कोटी ८२ लाखांच्या ठेवी ठेवल्या आहेत. यासोबत शेतकरी, व्यापारी, अडते, माथाडी यांच्या हिताची कामे करण्याला प्राधान्य दिले आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती भारत पाटील भुयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाच्या काळात शेतीमाल, फळे भाजीपाला, शाबू, वरी, मिरची पावडर, हळद पावडर, चहा, जनावरे बाजार नियमनात आहे. केंद्र सरकारच्या ई-नाम योजनेत बाजार समितींचा समावेश आहे. बाजारात आवक होणाऱ्या शेतीमालांची गेट इन्ट्री, ट्रेड ॲप्रुल, ई ऑक्शन, सेल, ॲग्रीमेंट, बिले, गेट एक्झीट प्रक्रिया सुरू आहे. ई पेमेंटसाठी शेतकरी व व्यापाऱ्यांनी नोंदणी सुरू आहे. पणन मंडळाच्या सूचनेनुसार ई नामची व्याप्ती वाढवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावांची नोंद पोर्टलवर होत आहे.’’
संचालक मंडळ येण्यापूर्वी समितीकडे १६ कोटी ८ लाखांच्या ठेवी होत्या. त्यात आपल्या कारकिर्दीत २ कोटी ४४ लाखांनी वाढ केली आहे. त्यानुसार समितीकडे १८ कोटी ५२ लाखांच्या ठेवी ठेवल्या आहेत. सदस्यांच्या सहकार्यामुळे उत्पन्नात २ कोटी ८२ लाखांनी वाढ झाल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. शेतकरी व्यापाऱ्यांच्या मागणी प्रमाणे गेट ४ ते ७ गेट १ ते समिती कार्यालय पर्यंतचे रस्त्यांचे काम पूर्ण झाले. गेट नंबर दोन पर्यंत सिमेंट रस्ता होणार आहे. शाहू मार्केट यार्डातील अन्य रस्त रुंदीकरण व डांबरीकरणासाठी इस्टीमेंट तयार करून मंजुरी पणन खात्याकडे प्रस्ताव देत आहोत. बाजार समितीत फेब्रुवारी व मार्चमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना शासनाने अनुदान जाहीर केले. त्यानुसार कांदा उत्पादकांचे वळेत प्रस्ताव सादर केले. त्यानुसार १२ कोटी ३५ लाखांचे अनुदान खात्यावर शेतकऱ्यांच्या जमा झाले. गूळ, शेंग, फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याचे सौदे सुरळीत सुरू आहेत. शाहू सांस्कृतिक मंदिर व स्टेट बॅंकेचे स्टक्चरल ऑडिट केले आहे. बाजार आवारात शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचे नियोजन आहे. मलकापूर उपबाजार आवारात लेआऊट मलकापूर नगरपालिकेने मंजूर केला आहे. शेतीमाल वजन ते काटपट्टीच्या संगणकीय नोंदणीसाठी नियोजन केले आहे,. सर्वपक्षीय जिल्हा नेत्यांचे मार्गदर्शन, संचालक मंडळ कर्मचारी वर्ग व्यापारी, अडते, माथाडी आदी घटकांच्या सहकार्याने कामकाज व सुरळीत केल्याचे पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com