‘अकरावी विज्ञान’चा कटऑफ वाढला

‘अकरावी विज्ञान’चा कटऑफ वाढला

‘अकरावी विज्ञान’चा कटऑफ वाढला
दहावीचा टक्का वाढल्याचा परिणाम : ‘एमआर’ सर्वाधिक ९४ टक्क्यांना क्लोज
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ११ : अकरावी विज्ञान शाखेचा कटऑफ गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याचे दिसून येत आहे. दहावीच्या निकालात आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गुणातही झालेल्या वाढीचा हा परिणाम आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत एम. आर. कनिष्ठ महाविद्यालय सर्वाधिक ९४ टक्क्यांना क्लोज झाले. त्यापाठोपाठ साधना कनिष्ठ महाविद्यालय ९३.८० टक्क्यांना, तर गडहिंग्लज कनिष्ठ महाविद्यालय ९३.४० टक्क्यांना बंद झाले आहे.
शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेसाठी २८ मेपासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आठ कनिष्ठ महाविद्यालयांत १५०० प्रवेश क्षमता आहे. यंदा १६९६ अर्जांची विक्री झाली होती. यातील १६१९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले. प्रवेश क्षमतेपेक्षा ११९ अधिक अर्ज आले आहेत. त्यांची छाननी प्रक्रिया पार पाडण्यात आली. त्यानंतर आज सायंकाळी पाचला प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली.
महाविद्यालयनिहाय कटऑफ असा- (अनुदानित तुकडी)- एम. आर. कनिष्ठ महाविद्यालय (९४.००), साधना कनिष्ठ महाविद्यालय (९३.८०), गडहिंग्लज कनिष्ठ महाविद्यालय (९३.४०), रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय (९२.००), संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय (९१.४२). (विनाअनुदानित तुकडी)- गडहिंग्लज कनिष्ठ महाविद्यालय (९१.६०), एम. आर. कनिष्ठ महाविद्यालय (९०.२०), साधना कनिष्ठ महाविद्यालय (८९.८०), रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालय (८९.६०), संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय (८८.००), क्रिएटिव्ह कनिष्ठ महाविद्यालय (८७.४०), साई इंटरनॅशनल कनिष्ठ महाविद्यालय (८७.००), मराठा मंदिर कनिष्ठ महाविद्यालय (८६.६०).
----------------
अशी असेल दुसरी फेरी
पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ज्या-त्या महाविद्यालयात उद्यापासून (ता. १२) शनिवारपर्यंत (ता. १५) प्रवेश निश्‍चित करायचे आहेत. पसंती क्र. १ सोडून अन्य महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीसाठी अर्ज करता येईल. त्यासाठी १७ ते २० जून हा कालावधी आहे. दुसरी गुणवत्ता यादी २५ जूनला जाहीर होणार आहे. तसेच पसंती क्रमांक, जात व समांतर आरक्षण बदलण्यासाठी विद्यार्थ्यांना १७ ते २० जून या कालावधीत अर्ज करता येतील, अशी माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी तथा केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीचे सचिव तथा आर. आर. कोरवी व कार्याध्यक्ष संजय कुंभार यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com