सकाळ-सोबतीचा करार

सकाळ-सोबतीचा करार

लोगो- क्यूआर कोड ः शनिवारी प्रसिध्द झालेल्या बातमीतून
............

‘सोबतीचा करार’ची उत्सुकता शिगेला
गीतकार वैभव जोशी यांच्या कविता-गझलांचा रविवारी आविष्कार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : ‘मज आयुष्याचा माझ्या कळलेला आशय नाही, जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही...,’ अशा आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या कविता नेहमीच साऱ्यांना भुरळ घालतात. प्रसिद्ध कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या अशाच कविता आणि गझलांचा अनोखा आविष्कार ‘सोबतीचा करार’ या मैफलीतून कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात रविवारी (ता. १६) सायंकाळी चार वाजता ही मैफल रंगणार आहे. ‘सकाळ’या मैफलीचे माध्यम प्रायोजक आहे.
आघाडीचे कवी, गीतकार अशी वैभव जोशी यांची ओळख आहे. त्यांच्या स्वरचित मराठी हिंदी कविता, गझलांचे सादरीकरण ‘सोबतीचा करार’मधून होते. स्वतः वैभव जोशी खुमासदार शैलीतून, प्रेम, नातेसंबंध, तत्त्‍वज्ञान अशा अनेक विषयांवरील भाष्य करणाऱ्या, अंतर्मुख करायला लावणाऱ्या कविता, गझल सादर करतात. प्रसिद्ध गझल गायक दत्तप्रसाद रानडे शब्दप्रधान सुरेल गायनातून गझल सादर करतात. डॉ. आशिष मुजुमदार यांचे संगीत असून, निनाद सोलापूरकर (तबला), समीर शिवगार (ढोलक, पखवाज), आमोद कुलकर्णी आणि मिलिंद शेवरे (गिटार) यांची साथसंगत असेल.
...
पुण्याच्या रसिक साहित्य
प्रकाशन संस्थेतर्फे आयोजन
एक कवी, एक गायक, एक संगीतकार असणारा हा ‘सोबतीचा करार’ लवकरच १५० व्या प्रयोगाकडे वाटचाल करत आहे. पुण्याच्या रसिक साहित्य पुस्तक विक्री, प्रकाशन संस्थेने कवी वैभव जोशी यांचे तीन कविता, गझलसंग्रह प्रकाशित केले आहेत. याच संस्थेने आजवर सर्वत्र महाराष्ट्रात ‘सोबतीचा करार’चे प्रयोग सादर केले आहेत. मनोरंजनातून साहित्य प्रसार व्हावा, हाच त्यामागील उद्देश आहे.
...
क्यूआर कोड-
सन्मानिका नाहीत, प्रवेशिका उपलब्ध...
मैफलीसाठी विनामूल्य सन्मानिका दिल्या जाणार नाहीत. प्रवेशिका TICKET KHIDAKEE या संकेतस्थळावर आहेत. त्यासाठी खाली दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा. माहितीसाठी संपर्क : सूरज (९५५२५८१९१८)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com