डेंगीसाठी वापरा जळके ऑईल

डेंगीसाठी वापरा जळके ऑईल

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी साचलेल्या
पाण्यात टाका जळके ऑईल : डॉ. साळे
राजारामपुरी आरोग्य केंद्रात साथरोगांची आढावा बैठक
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : साचलेल्या पाण्यात डास तयार होतात. त्यांच्यामुळेच साथीचे आजार वाढत असल्याने डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जळके ऑईल डबक्यामध्ये तसेच साचलेल्या पाण्यात टाका, असा सोपा उपाय हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. योगेश साळे यांनी सांगितला.
झिका, डेंगी, चिकुनगुनिया आदी साथरोगाचा हिवताप विभागाचे सहायक संचालक हिवताप डॉ. योगेश साळे यांनी आज महापालिकेच्या राजारामपुरीतील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात आढावा घेतला. डॉ. साळे म्हणाले, ‘‘डासांची उत्पत्तीस्थान नष्ट करणे हे महत्त्वाचे काम आहे. दुचाकी किंवा चारचाकी वाहनामधील ऑईल दोन ते तीन महिन्यांनी बदलतो. ते जळके ऑईल जर परिसरामधील डबक्यामध्ये किंवा साचलेल्या पाण्यामध्ये टाकल्यास तवंग तयार होतो. त्यामुळे पाण्यातील अळ्यांना श्‍वास घेता येत नसल्याने त्या मरतात. त्यातून डास तयार होण्याचे प्रमाण कमी होते. सर्व नागरिकांनी ही उपाययोजना केल्यास डासांचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.’’ यावेळी आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा, किटकशास्त्रज्ञ सतीश सावंत, प्रणव जाधव, डॉ. योगिनी कुलकर्णी, डॉ. निखिल पाटील, डॉ. आरती बिराजदार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com