मतदारांनी यादीतील नावाबाबत सजग रहावे

मतदारांनी यादीतील नावाबाबत सजग रहावे

Published on

मतदारांनी यादीतील नावाबाबत सजग रहावे
तहसीलदार राजेश चव्हाण ः नाव, पत्ता नोंदणीबाबत आवाहन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ५ ः लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदार यादीतील नावामध्ये अडचणी आल्याचे लक्षात आल्यानंतर निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार नोंदणी, पत्ता, नावात बदल, नाव वगळणे आदी कामे केली जाणार आहेत. २५ जूनपासून या कामाला सुरुवात झाली आहे. २४ जुलैपर्यंत ते चालणार आहे. त्यामुळे मतदारांनी नावाची खात्री करावी, असे आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केले आहे.
ते म्हणाले, ‘केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला सूचना केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन याबाबत माहिती दिली. त्यानुसार हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. नाव बदलणे, नाव वगळणे, जुना फोटो बदलून नवीन घालणे आदी बदल करता येणार आहेत. यासाठी केंद्रस्तरीय मतदान अधिकारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. २४ जुलैपर्यंत नोंदणी पूर्ण झाल्यानंतर २५ जुलैला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत मतदानाला अडचण येऊ नये, यासाठी मतदारांनी आताच मतदार यादीत नावाची खात्री करावी, असे आवाहन तहसीलदार चव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार सुरेश दळवी, सहायक अमर साळुंखे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.