दूध दरवाढ

दूध दरवाढ

Published on

‘गोकुळ’च्या गाय दूध विक्रीत दोन रुपयांची वाढ
मुंबई, पुणे येथे दरवाढ लागू : दुधाचा प्रतिलिटर ५४ वरून ५६ रुपये दर
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : राज्यातील सर्वच सहकारी आणि खासगी दूध संघांनी गाय दूध दरात वाढ केली आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाने मुंबई आणि पुणे येथे विक्री होणाऱ्या गाय दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे, पूर्वी प्रतिलिटर गाय दूध ५४ रुपयेला विक्री होत होते. आजपासून हाच दूध दर ५६ रुपये झाला आहे. ‘गोकुळ’च्या गाय दुधाची मुंबईमध्ये तीन लाख लिटर आणि पुण्यात ४० हजार लिटरची विक्री होते. दूध पावडर विक्रीमध्ये तोटा सहन करणाऱ्या संघांना या दरवाढीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
राज्यातील सहकारी आणि खासगी दूध संघांनी गाय दूध दरात वाढ केली आहे. दरम्यान, मुंबई व पुणे येथे ‘गोकुळ’च्या चांगल्या आणि दर्जेदार दुधाला मोठी मागणी आहे. इतर संघांनी विक्री दर वाढवला असतानाही ‘गोकुळ’ने काही दिवस आपले दर कमीच ठेवले होते. दरम्यान, वाढता खर्च आणि दूध पावडरीमधील होणाऱ्या तोट्याचा ताळमेळ घालण्यासाठी सध्या वाढलेल्या दरामुळे उत्पादक आणि संघाला हातभार लागणार आहे. राज्यातील सर्वच दूध संघांनी दरवाढ केल्यानंतर ‘गोकुळ’नेही दरवाढ करावी, अशी चर्चा संचालक मंडळाच्या बैठकीत झाली होती. त्यानुसार कालपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, दरवाढीमुळे दूध विक्रीवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत आहे. पूर्वीप्रमाणे दूध विक्री सुरू असून आणखी दुधाला मागणी वाढण्याची शक्यता आहे.
....

‘गोकुळ’ची मुंबई व पुणे येथील गाय दूध विक्री
शहर* एकूण दूध विक्री* पूर्वीचा दर* सध्याचा दर
मुंबई* ३ लाख लिटर* ५४ रुपये* ५६ रुपये
पुणे* ४० हजार लिटर* ५४ रुपये* ५६ रुपये
...

‘राज्यातील सर्व दूध संघांनी मुंबई आणि पुण्यातील गाय दूध विक्रीचे दर वाढवले आहेत. त्यामुळे ‘गोकुळ’नेही प्रतिलिटर दोन रुपये दर वाढ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार तो लागू केला आहे.
- अरुण डोंगळे, अध्यक्ष, गोकुळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.