वृक्षारोपण मोहिमेसाठी सरसावले खेळाडू

वृक्षारोपण मोहिमेसाठी सरसावले खेळाडू

94323
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नव्याने निर्माण केलेल्या मैदानांच्या परिसरामध्ये खेळाडूंनी वृक्षारोपण केले.
.......
वृक्षारोपण मोहिमेसाठी सरसावले खेळाडू

सानेगुरुजी, आपटेनगर वसाहतीतील मैदानांवर १२० हून अधिक देशी रोपांची लागवड

सुयोग घाटगे : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या विनर्स इलेव्हन व चॅलेंजर्स क्रिकेट क्लबच्या खेळाडूंनी सावली ग्रुपच्या सहकार्याने परिसरात वृक्षारोपणाची मोहीम यशस्वी केली. दोन रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी १२० हून अधिक देशी झाडांचे वृक्षारोपण केले. यासाठी सावली ग्रुपने ४०, विनायक जाधव यांनी ५० तर खेळाडूंनी वर्गणी काढून ३० झाडांसाठी सहकार्य केले.
सानेगुरुजी व आपटेनगर वसाहत परिसरातील महानगरपालिकेच्या नव्याने निर्माण केलेल्या मैदानांच्या परिसराच्या भोवतीने वृक्षारोपण करण्यात आले. देशी वृक्षांची लागवड व संगोपन असा हेतू असून, यामुळे परिसर हिरवाईने नटण्याबरोबरच परिसरातील हवा शुद्ध होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेसाठी परिसरातील ३० हून अधिक युवक सरसावले आहेत. विनर्स इलेव्हन व चॅलेंजर्स क्रिकेट क्लब या खेळाची आवड जपणाऱ्या युवकांकडून वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मैदान व परिसराची स्वच्छता, क्रीडा मार्गदर्शन असे उपक्रमही राबविले जातात.
पावसाळा सुरू झाल्याने सध्या रविवार व सार्वजनिक सुटीचा दिवस गाठून मैदानाबाहेर व आतील बाजूने वृक्षारोपण सुरू करण्यात आले. यामध्ये वड, पिंपळ, कडूनिंबासह अन्य देशी व औषधी गुणधर्म असणारी रोपे लावण्यात आली असून, त्यांच्या भोवती ट्री गार्ड लावून त्यांची सुरक्षितता जपली जाणार आहे. मैदानांच्या निर्मितीसाठी व वृक्षारोपणासाठी येथील माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांचेही सहकार्य लाभले आहे.
.....
चौकट
आबालवृद्धांचा सहभाग
व्यवसायाने विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्यांसोबतच अनेक कॉलेज व शाळेला जाणारे विद्यार्थी मोहिमेत सहभागी होत आहेत. एकत्रित येऊन क्रिकेट, फुटबॉलचे धडे देण्याबरोबरच लहान मुलांमध्ये खेळाविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या ग्रुपच्या सदस्यांमध्ये अवघ्या सहा वर्षांपासून ५५ वर्षांपर्यंतचे खेळाडू सदस्य आहेत.
....
कोट
पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. येणाऱ्या पिढीला पर्यावरणाचे महत्त्व पटवून द्यायचे असेल तर ते कृतीतून पटवून देणे गरजेचे आहे. प्रत्येकाने ही जबाबदारी आपली म्हणून स्वीकारल्यास येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आरोग्यसंपन्न वातावरण निर्माण करणे शक्य होईल.
- सर्व खेळाडू व सदस्य
........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com