पंचायत समिती इमारतीचे जतन करणार

पंचायत समिती इमारतीचे जतन करणार

Published on

ajr22.jpg....
94347
आजरा ः येथील आजरा पंचायत समितीची जूनी इमारत.
--------
पंचायत समिती इमारतीचे जतन करणार
गटविकास अधिकारी संजय ढमाळ ः नवीन इमारत सुशोभिकरणाचा लवकरच प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
आजरा, ता. २ ः पंचायत राज स्थापनेपासून अव्याहतपणे सेवा देणारी आजरा पंचायत समितीची जुनी इमारत जतन करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. ती जतन करण्याबरोबरच नवीन इमारतीच्या परिसराचे सुशोभिकरणही केले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. यासाठी सुमारे एक कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी सांगीतले.
१९६२ मध्ये महाराष्ट्रात पंचायत राज स्थापन झाले. त्यापूर्वी येथे आजरा पंचायत समितीची इमारत उभारली होती. परिसरात इचलकरंजी संस्थानकालीन जुन्या इमारती होत्या. या इमारतीमधून पंचायत समितीमधील विविध विभागांचा कारभार सुरु होता. सध्या जुनी इमारत विशेष वापरात नाही. येथे पशुवैद्यकीय विभागाचे कार्यालय सुरु आहे. येथे दहा वर्षांपूर्वी नवीन अद्यावत पंचायत समितीची इमारत उभारली आहे. तिचे २५ मे २०१३ ला उद्‍घाटन झाले. त्यानंतर नवीन इमारतीतून पंचायत समितीचे कामकाज सुरु आहे. जुनी इमारत वापराविना पडून राहिल्यामुळे या इमारतीची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात छप्पर गळती सुरु आहे. इमारतीजवळ झाडे झुडपे वाढली आहेत. डागडूजी करण्याबरोबर तिचे जतन केले जाणार आहे.
पंचायत समितीच्या नुतन इमारत परिसराचे काँक्रीटीकरण व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यासाठी एक कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला जाणार आहे. इमारतीसह नवीन इमारतीच्या संरक्षक भिंतीसाठी पन्नास लाख रुपये जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
--------------
१९६० पुर्वीच्या इमारती जतन करण्याचा शासनाचा निर्णय आहे. ती पुरातत्व असल्याने तिचे जतन केले जाणार आहे. इमारतीची डागडूजी करण्याबरोबर या परिसराचे काँक्रीटीकरण व सुशोभिकरण केले जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवला जाणार आहे.
- सुर्यकांत नाईक, उपअभियंता, पंचायत समिती आजरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.