तंत्रशिक्षण विद्यापीठाची ‘सायबर क्राईम’कडे तक्रार

तंत्रशिक्षण विद्यापीठाची ‘सायबर क्राईम’कडे तक्रार
Published on

तंत्रशिक्षण विद्यापीठाची
‘सायबर क्राईम’कडे तक्रार

अभियांत्रिकी शाखेचा पेपर व्हायरल प्रकरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः अभियांत्रिकी शाखेच्या द्वितीय वर्षातील युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज भाग दोनचा पेपर (प्रश्नपत्रिका) सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या शक्यतेवरून लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाने सोमवारी संबंधित पेपर रद्द केला. पेपर व्हायरल प्रकरणाबाबत या विद्यापीठाकडून सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या विद्यापीठाकडून सोमवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज भाग दोनचा पेपर घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर आले. मात्र, संबंधित पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या निर्दशनास आले. त्यावर दक्षता म्हणून तातडीने कार्यवाही करत पहिला पेपर रद्द करून त्याच विषयाचा दुसरा पेपर परीक्षा विभागाकडून देण्यात आला. पेपर अचानकपणे बदलल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, याबाबत तंत्रशास्त्र विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. एन. एस. जाधव यांनी सांगितले की, ‘युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज भाग दोन या पेपरचे फोटो आणि त्यातील काही आशय सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आम्हाला समजले. विद्यापीठाकडून दिला जाणारा पेपर ज्या संस्थेतून डाऊनलोड केला जातो. त्या संस्थेचा ई-मेल आयडी, आयपी, वेळ आणि तारीख आदी तपशिलाचा उल्लेख असतो. अशा स्वरुपातील पेपर अधिकृत असतो. मात्र, या स्वरुपातील उल्लेख नसल्यास कोणीतरी चुकीच्या पद्धतीने छेडछाड करून सोशल मीडियावरून पेपर व्हायरल करत असेल, तर ते चुकीचे आहे. ते लक्षात आल्याने विद्यापीठाने विद्यार्थ्यांना पेपर बदलून दिला आहे.’
...
कोल्हापूरसह तीन जिल्ह्यांत २५ हजार विद्यार्थी
या विद्यापीठाशी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील १८ अभियांत्रिकी महाविद्यालये, ३३ फार्मसी कॉलेज आणि एक आर्किटेक्चर कॉलेज संलग्नित आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये सुमारे २५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com