रेशन दुकानदार आंदोलन बातमी

रेशन दुकानदार आंदोलन बातमी

94295
कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी रास्तभाव धान्य दुकानदारांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. (नितीन जाधव : सकाळ छायाचित्रसेवा)

निर्देशांकाप्रमाणे कमिशन वाढवा
धान्य दुकानादारांची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : रेशन दुकानदारांना महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे किमान शंभर रुपये प्रतिक्विंटल इतके कमिशन वाढवून मिळावे, अस्वच्छ धान्याचा पुरवठा करू नये, दुकानदारांना वितरणातील तूट मंजूर करून मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी मंगळवारी रेशन धान्य दुकानदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघ यांच्यातर्फे हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी १२ वाजता एकत्र आले. यावेळी त्यांनी शासनाविरोधात घोषणा देऊन आपल्या मागण्यांचा पुनर्उच्चार केला. त्यानंतर त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले. निवेदनातील माहितीनुसार, राज्याच्या अन्न व पुरवठा मंत्र्यांबरोबर १० जानेवारी २०२३ रोजी रेशन धान्य दुकानदारांच्या समस्यांबद्दल बैठक झाली होती. मात्र, त्यानंतर शासनाने यावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. महागाई वाढत असताना रेशन धान्यदुकानदारांचे कमिशन मात्र त्या प्रमाणात वाढत नाही. त्यामुळे प्रतिक्विंटल १०० रुपये कमिशन करावे. तसेच, कमिशनचे प्रमाण महागाईच्या निर्देशंकानुसार ठरवावे. ही प्रमुख मागणी आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन करू.
या आंदोलनात जिल्हा संघटनेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र मोरे, महाराष्ट्र राज्य धान्य दुकानदार संघटनेचे जनरल सेक्रेटरी चंद्रकांत यादव, उपाध्यक्ष आबू बारगीर, पन्हाळा तालुका अध्यक्ष आनंदा लादे, कागल तालुका अध्यक्ष संदीप लाटकर, कोल्हापूर शहराध्यक्ष राजेश मंडलिक, इचलकरंजी शहराध्यक्ष पांडुरंग सुभेदार, हातकणंगले अध्यक्ष श्रीपती पाटील, करवीर अध्यक्ष संदीप पाटील, शिरोळ अध्यक्ष महादेव कदम, आजरा अध्यक्ष संजय येसादे, सात्तापा शेणवी, दीपक शिराळे, गजानन हवलदार, सरिता हरुगले, सुनीता पाडेकर, गीता देसाई, छाया धनवडे, मल्लेश गुडदे, पुंडलिक कुदळे, ज्ञानदेव पाटील, जिल्ह्यातील धान्य दुकानदार सहभागी झाले होते.
-----------------
मागण्या अशा...
- प्रतिक्विंटल १०० रुपये कमिशन मिळावे
- धान्याच्या पोते दुकानदारांना ५० किलो, ५८० ग्रॅमप्रमाणे वजन करून द्यावे
- धान्य स्वच्छ आणि खाण्यायोग्य असावे
- लाभार्थ्यांची आधार कार्ड व अन्य प्रकारे ओळख पटवून घ्यावी लागते. त्यासाठी शुल्क घेण्याची परवानगी द्यावी
- थकलेले कमिशन तत्काळ द्यावे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com