शिवसेना संजय पवार प्रेस

शिवसेना संजय पवार प्रेस
Published on

...अन्यथा नियोजन समितीच्या
बैठकीत घुसून जाब विचारू
पवार, देवणे : प्रलंबित प्रश्नांबाबत पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावे


सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : ‘शहरातील बहुतांशी प्रश्‍न कायम आहेत. त्याचे उत्तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी द्यावे. अन्यथा, शनिवारी (ता. ६) होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसून जाब विचारला जाईल’, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
पवार, देवणे म्हणाले, ‘शहरातील शंभर कोटींच्या निधीतील रस्ते ‘युटिलिटी शिफ्‍टिंग’ न करताच सुरू आहेत. ठेकेदार मूळचा कोल्हापूरचा आहे. नाव मात्र सोलापुरातील ठेकेदाराचे आहे. अमृत योजनेचे काम २०१७ पासून आजपर्यंत सुरू आहे. भारतीय जनता पक्षातील मंत्र्यांच्या भावाकडे याचे काम आहे. तीनवेळा मुदतवाढ दिली आहे. त्याला ब्लॅक लिस्ट का केले जात नाही? रंकाळ्याचे मूळ दुखणे बाजूला ठेवून सुशोभीकरणावर भर दिला जात आहे. हद्दवाढीविरोधात निर्णय घेत नाहीत. शक्तिपीठ महामार्ग रद्दसाठी पालकमंत्री मुश्रीफ यांनी विधानसभेत आवाज का उठवला नाही? आम्हाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्यास अडविले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल.’
ते पुढे म्हणाले, ‘प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत. डेंगीची साथ वाढते आहे. संकेश्‍वर- सावंतवाडी महामार्गावर टोल वसुलीचे प्रयत्न सुरू आहेत. गडकिल्ल्यांचे संवर्धन झालेले नाही. धामणी प्रकल्प १७ वर्षे रखडलेला आहे. १७ गावे आणि १४ धनगरवाड्यांना आजही पाणी नाही. याचे उत्तर पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांनी दिले पाहिजे.’ यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, प्रतिज्ञा उत्तुरे, विशाल देवकुळे, मंजित माने उपस्थित होते.
...
शहरासह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
‘शहरासह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. चंदगडमध्ये गांजाची शेती केली जात असूनही पोलिसांकडून कानाडोळा होत आहे. कोल्हापुरात गांजा विक्री जोरात सुरू आहे. खुन्नस देणारी रिल्स अजूनही सोशल मीडियावर फिरत आहेत. खुनापाठोपाठ खून होत आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा एकाच पोलिस निरीक्षकाकडे का आहेत? जिल्ह्यातील पोलिस दलात खदखद आहे. अधीक्षकांकडून त्याची दखल घेतली जात नाही, त्याबाबत विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार करणार असल्याचे देवणे आणि हर्षल सुर्वे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com