माजी कुलसचिवांसंदर्भातील याचिकेबाबत पुन्हा बैठक

माजी कुलसचिवांसंदर्भातील याचिकेबाबत पुन्हा बैठक

Published on

माजी कुलसचिवांसंदर्भातील
याचिकेबाबत पुन्हा बैठक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : शिवाजी विद्यापीठातील नोकरभरती प्रकरणावरून माजी कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील याचिकेबाबत आज व्यवस्थापन परिषदेची विशेष बैठक झाली. त्यात सदस्यांमध्ये निर्णयावर एकमत झाले नाही. त्यामुळे याबाबत पुन्हा १८ जुलै रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आज झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, तर सचिवपदी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे होते. या नोकरभरतीबाबत डॉ. मुळे यांच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विद्यापीठ विकास मंच, आदींसह विविध सुमारे वीस संस्था, व्यक्तींनी विद्यापीठ, राज्य शासन, कुलपती कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या. त्यावर चौकशीसाठी देशपांडे, शानबाग, देसाई समित्या नेमण्यात आल्या. पुढे या तक्रारींच्या अनुषंगाने विद्यापीठाने अधिकार मंडळांच्या मान्यतेनुसार सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. डॉ. मुळे यांना निवृत्तीवेतन देण्याच्या अनुषंगाने मान्यता देण्यासाठी संबंधित याचिका शुक्रवारी (५ जुलै) होणाऱ्या लोकअदालतीपूर्वी मागे घ्यायची अथवा नाही याबाबतचा निर्णय घेण्यासाठी विद्यापीठाने व्यवस्थापन परिषदेची विशेष बैठक आज घेतली. त्यात काही सदस्यांनी याचिका मागे घ्यावी, तर काहींनी ती कायम ठेवावी, असे मत व्यक्त केल्याने ठाम निर्णय झाला नाही. त्यामुळे आता याबाबत पुन्हा १८ जुलै रोजी बैठक घेतली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.