पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूरची आघाडी

पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूरची आघाडी

फोटो
94422
94423
94424
94425
94427
94428
94429
94431
94433
...
पाचवी, आठवी शिष्यवृत्तीत कोल्हापूरची आघाडी

सिद्धेश आंबेकर, पियुष पाटील द्वितीय; राज्याच्या गुणवत्ता यादीत ८३ विद्यार्थी चमकले

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ ः राज्य परीक्षा परिषदेतर्फे इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि आठवी (पूर्व माध्यमिक शाळा) शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. त्यात राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ८३ विद्यार्थी चमकले आहेत. त्यात पाचवी (ग्रामीण विभाग) मध्ये पियुष संभाजी पाटील (विद्यामंदिर खामकरवाडी, ता. राधानगरी), सिद्धेश शैलेश आंबेकर (केंद्रशाळा तारळे खुर्द, ता. राधानगरी) यांनी ९६.६४ टक्के गुणांसह राज्यात द्वितीय क्रमांक, तर जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत अव्वल स्थान पटकविले आहे.
राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये शहर विभागात (पाचवी) कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांतील चार विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यामध्ये समर्थ पाटील (राज्यात सातवा आणि शहरात प्रथम क्रमांक, श्री. अवधूत विद्यालय शुक्रवारपेठ), मृणाली सचिन जाधव (राज्यात १३ वी), आराध्या विकास पाटील (राज्यात १५ वी, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालय), हर्षदा किशोर सुतार ( राज्यात १५ वी, टेंबलाईवाडी विद्यालय) यांचा समावेश आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. राज्य गुणवत्ता यादीतील गुणवत्ताधारकांपैकी १९ टक्के विद्यार्थी कोल्हापूरचे आहेत. इयत्ता पाचवीच्या परीक्षेची जिल्ह्याची टक्केवारी ३८.९६, तर आठवीची टक्केवारी २६.७१ इतकी आहे. या दोन्ही परीक्षेत शहर आणि ग्रामीण विभागातील एकूण ८३ विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले आहे. त्यात पाचवी ग्रामीण विभागात शिवम कुदळे (राज्यात पाचवा आणि जिल्ह्यात दुसरा, मुदाळ प्रशाळा), वरद पाटील (राज्यात पाचवा, सोनाळी), आराध्या उत्तम पाटील (राज्यात पाचवी, म्हाकवे), स्वरांजली करवळ (राज्यात सहावी,सोनाळी), स्वरा पाटील (राज्यात सहावी, नांदोली), आराध्या संजय पाटील (राज्यात आठवी म्हाकवे), चिन्मयी थोरवत (राज्यात आठवी, उत्तूर) आणि आठवी ग्रामीण विभागामध्ये अथर्व हासबे आणि रोहित पाटील (राज्यात सहावा, भुदरगड), अनुष्का पोटे (राज्यात सहावी, उत्तूर), श्रेया माळी (कणेरी), राजवर्धन पाटील (मुदाळ), स्मिता रेडेकर (पळशिवणे, राज्यात नववा क्रमांक), आदींचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांवर त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, शिक्षक आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
...
ग्रामीण विभागात ‘भुदरगड’ अव्वल
जिल्ह्यात पाचवी, आठवीचे एकूण ११६२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. त्यांत सर्वाधिक १५६ विद्यार्थी भुदरगड तालुक्यामधील आहेत. त्यापाठोपाठ कागल तालुक्याचे १३९, तर राधानगरी तालुक्यातील १२४ विद्यार्थी आहेत. राज्याच्या निकालाच्या तुलनेत जिल्ह्याच्या निकालाची सरासरी अधिक असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी सांगितले.
...
शहरी विभागात महापालिका शाळांचे यश
शहरी विभागामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या शाळांतील एकूण १७४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी सांगितले. इचलकरंजी महानगरपालिकेच्या शाळेतील एकूण ८२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
...
राज्याच्या गुणवत्ता यादीतील कोल्हापूरचे विद्यार्थी
इयत्ता पाचवी ग्रामीण -२८
इयत्ता पाचवी शहरी-१६
इयत्ता आठवी ग्रामीण-२६
इयत्ता आठवी शहरी-१३
...
तालुकानिहाय शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
भुदरगड (१५६), कागल (१३९), राधानगरी (१२४), करवीर (९४), आजरा (७८), गडहिंग्लज (७६), शिरोळ (७४), हातकणंगले (५०), चंदगड (४५), शाहूवाडी (३३), पन्हाळा (२६), गगनबावडा (११).
...
निकालाची टक्केवारी
इयत्ता* राज्याची टक्केवारी* कोल्हापूर जिल्ह्याची टक्केवारी
पाचवी*२४.९१*३८.९६
आठवी*१५.२३*२६.७१.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com