पासिंग दंड आकारणी रद्द करा

पासिंग दंड आकारणी रद्द करा

Published on

94426
कोल्हापूर : रिक्षा व टॅक्सी पासिंगला उशीर झाल्यास दरदिवशी ५० रुपये दंड आकारणी रद्द करावी, या व इतर मागण्यांसाठी रिक्षाचालक आणि वाहनधारक संघटनांनी दाभोळकर कॉर्नरला जेलभरो आंदोलन केले.
..........
पासिंग दंड आकारणी रद्द करा

वाहनधारक समितीतर्फे दाभोळकर कॉर्नर येथे रास्ता रोको

सकाळ वृत्त सेवा
कोल्हापूर ता. २ : ''आम्हाला काही देऊ नका. आमच्याकडून काही घेऊ नका.. ''सामान्य वाहनधारकांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो'' अशा घोषणा देत वाहनधारक समितीतर्फे दाभोळकर कॉर्नर येथे रास्ता रोको आणि जेलभरो आंदोलन केले. रिक्षा पासिंगच्या दररोज होणाऱ्या दंडाविरोधात आणि इतर मागण्यासाठी हे आंदोलन झाले.
रिक्षा व टॅक्सी पासिंगला उशीर झाल्यास दररोज ५० रुपये दंड आकारणी रद्द करावी, या मागणीसह इतर मागण्यांसाठी रिक्षा चालक आणि वाहनधारक संघटनांनी दाभोळकर कॉर्नर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सकाळी वाहतुकीवेळी आंदोलन झाल्याने चारही बाजूला वाहनांची कोंडी झाली होती. आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिसांसोबत कार्यकर्त्यांची जोरदार झटपट झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना ताब्यात घेतले. या मागणीसोबत रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ योजना स्थापन करावी, रिक्षाचालकांना असंघटित कामगार म्हणून घोषित करावे आणि सर्व योजनांचा लाभ मिळावा, रिक्षा टॅक्सी व इतर वाहनांच्या पासिंगसाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करावी, प्रलंबित रिक्षा व टॅक्सी थांबे त्वरित मंजूर करावेत, या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात आला.
आंदोलनात चंद्रकांत भोसले, संजय पवार, विजय देवणे, सतीशचंद्र कांबळे, राजू जाधव, अविनाश दिंडे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी दिलदार मुजावर, अतुल पवार, मोहन बागडी, राहुल पवार, रेहान मुजावर, विठ्ठल जानकर, विजय जेधे, सागर ओतारी, भास्कर भोसले, अरुण देवकुळे, मिलिंद सुतार, महेश पाटील, अरुण घोरपडे, शिवाजी पाटील, पोपट रेडेकर, संजय पाटील, महेश वासुदेव, संभाजी माने, निखिल पवार, ज्ञानेश्वर व्हटकर आदी उपस्थित होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.