कोकरेत विद्यार्थी- पालकांनी एसटी अडवली

कोकरेत विद्यार्थी- पालकांनी एसटी अडवली

chd31.jpg
94436
कोकरे : वाहतुकीची सोय करावी या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांनी एसटी अडवून धरली.
-------------------------
कोकरेत विद्यार्थी-पालकांनी एसटी अडवली
थांब्यावर गाडी थांबण्याची मागणी; स्वतंत्र गाडी सोडण्याचे आगारप्रमुखांचे आश्‍वासन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ : कोकरे (ता. चंदगड) येथील थांब्यावर एसटी थांबवली जात नसल्याने चंदगडला शाळेला येणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण होत होती. या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी जांबरेहून चंदगडकडे जाणारी गाडी सुमारे दोन तास अडवून धरली. आगार व्यवस्थापिका वासंती जगदाळे यांनी घटनास्थळी येऊन विनंती केल्यानंतर गाडी सोडली.
सकाळी साडेनऊ वाजता जांबरेहून चंदगडला येणाऱ्या गाडीला या मार्गावरील विविध गावांतील चंदगडला येणाऱ्यारे विद्यार्थी, बाजारपेठेत विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांचीही संख्या जास्त असते. त्यामुळे न्हावेलीला येईपर्यंत गाडी खचाखच भरते. त्यापुढील थांब्यावर चालक गाडीच थांबवत नाहीत. कोकरे हा या मार्गावरील शेवटचा थांबा असल्याने येथे तर गाडी थांबतच नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर होतो. पावसातून चालत जावे लागते म्हणून अनेक विद्यार्थी शाळेला दांडी मारतात. हा प्रकार लक्षात येताच काल पालकांनी पाल्यांसह जांबरेहून चंदगडला जाणारी गाडी अडवून धरली. सुमारे दोन तासानंतर आगार व्यवस्थापिका जगदाळे घटनास्थळी आल्या. त्यानंतर गाडी सोडली. दरम्यान, सरपंच जोतिबा किरमटे यांच्यासह पालकांनी आगारात येऊन जगदाळे यांची भेट घेतली. आपल्याकडे गाड्या कमी असल्याने अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जांबरेहून चंदगडला येणारी गाडी चंदगडमध्ये प्रवासी उतरवून पुन्हा कोकरेपर्यंत सोडली जाईल, असे आश्‍वासन दिले. त्यानुसार आज ही गाडी सोडल्याचे पालक प्रसाद कसेकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com