पशुधनाच्या चाऱ्यासाठी बिया संकलनाचा उपक्रम

पशुधनाच्या चाऱ्यासाठी बिया संकलनाचा उपक्रम

94469
संकलित बिया वनविभागाकडे सुपूर्द करताना निसर्गमित्रचे सदस्य.
........
पशुधनाच्या चाऱ्यासाठी बिया संकलनाचा उपक्रम

निसर्गमित्रकडे दीड लाख बिया जमा ः पाच हजार रोपांची निर्मिती

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः दुधाचा सकसपणा वाढविण्यासोबत जनावरांना होणाऱ्या आजारांवर रामबाण उपाय असणाऱ्या वनस्पतींची लागवड व्हावी यासाठी निसर्गमित्र परिवाराने पुढाकार घेतला आहे. दुधाळ जनावरे संवर्धन वर्ष व वनमहोत्सवाचे औचित्य साधून निसर्गमित्र संस्थेने मानव तसेच पशुधनासाठी सकस अन्ननिर्मितीच्या दृष्टीने केलेल्या बिया संकलन आवाहनाला कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यातून तब्बल दीड लाख दुर्मीळ बिया लोकसहभागातून जमल्या. यातून पाच हजार रोपांची निर्मिती करून शिल्लक बिया सामाजिक वनीकरण गारगोटी विभागाकडे सुपूर्द केल्या.
उपक्रमाची माहिती देताना निसर्गमित्रचे कार्यवाह अनिल चौगुले म्हणाले, ‘निसर्गमित्र परिवारातर्फे दरवर्षी बिया संकलनाचा उपक्रम राबविला जातो. यंदा लोकसहभागातून दीड लाख, इतर मोठ्या संख्येने विविध प्रकारच्या दुर्मीळ बिया जमा झाल्या. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी बेल, टेंभुर्णी, जांभूळ, बहावा, फणस, हिरडा, गावठी आंबा, शेंद्री, पळस, हादगा, गोकर्ण, गुळवेल, अश्वगंधा, सब्जा, पानवेल, आवळा, शेवगा, पेरू, सीताफळ, वाळा भोकर, वेखंड कडीपत्ता, लिंबू, तमालपत्र, चिंच, म्हाळुंग, मिरी, कवठ, शमी, काटेसावर, कडूनिंब, रिटा, बदुर्गी अशा वनस्पतींच्या बिया दिल्या होत्या. या बियांतून निसर्गमित्र सदस्य व आदर्श सहेली मंचच्या महिलांनी सुमारे पाच हजार रोपांची निर्मिती केली. विविध प्रकारची रोपे २८२३/४८ बी वॉर्ड, महालक्ष्मीनगर, गोखले कॉलेज रोड, कोल्हापूर येथे ३१ जुलैपर्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. इच्छुकांनी त्यासाठी संपर्क साधावा.’
रोपनिर्मिती करून शिल्लक राहिलेल्या बिया सामाजिक वनीकरण गारगोटी विभागाच्या वनक्षेत्रपाल उज्ज्वला मगदूम, वनपाल आनंदा ठोंबरे, वनरक्षक पी. बी. चव्हाण व जयसिंग पाटील यांच्याकडे प्रा. राजय पाटील यांच्या हस्ते सुपूर्द केल्या. या उपक्रमासाठी अनंत कुलकर्णी, पै. बाबाराजे महाडिक, दिलीप खराडे, संदीप पाटील, अनिता गावडे, राणिता चौगुले, यश चौगुले, सर्जेराव वाडकर, अवधूत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
...............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com