क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र त्‍वरीत सुरू करा

क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र त्‍वरीत सुरू करा

Published on

94500
कोल्हापूर : क्रीडा प्रबोधिनीतील निवासी फुटबॉल केंद्र कोल्हापुरात पुन्हा सुरू व्हावे, या मागणीसाठी फुटबॉलप्रेमी नागरिक आणि खेळाडूंनी मिरजकर तिकटी हुतात्मा स्तंभासमोर निदर्शने केली (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)
......
निवासी फुटबॉल केंद्र
कोल्हापुरात सुरू करा

फुटबॉलप्रेमींची निदर्शने ः पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ ः राज्य शासनाच्या क्रीडा विभागाने कोल्हापुरातून पुण्यात हलविलेले क्रीडा प्रबोधिनीचे निवासी फुटबॉल केंद्र पूर्ववत कोल्हापुरात आणावे. याची दखल पालकमंत्र्यांनी त्वरित घ्यावी; अन्यथा तीव्र आंदोलनाशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही, असा इशारा कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमींनी आज मिरजकर तिकटी येथे झालेल्या आंदोलनादरम्यान दिला.
याबाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये मंगळवारी (ता. १) ‘खेळ कोल्हापुरात अन् फुटबॉल केंद्र पुण्यात’ असे प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत आज फुटबॉलप्रेमींनी मिरजकर तिकटी येथे राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या निर्णयाविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. खरे पाहता १६ जुलै १९९६ रोजी तत्कालीन राज्य सरकारने हे केंद्र कोल्हापुरात सुरू केले होते. काही काळानंतर ते पुण्याला हलविले. त्यानंतर आजतागयत हे केंद्र पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतच सुरू आहे. दरवर्षी राज्यातील खेळाडूंना प्रवेश दिला जातो. मात्र, पुण्यापेक्षा कोल्हापुरात फुटबॉल खेळणारी मंडळी अधिक आहेत. त्यांच्या खेळाच्या विकासासाठी हे केंद्र आवश्‍यक होते. मात्र, क्रीडा विभागाने काहीही कारण न देता हे केंद्र २४ वर्षांपूर्वी येथून हलविले आहे. ते पूर्ववत कोल्हापूरात सुरू करावे, अशी मागणी फुटबॉलप्रेमींकडून करण्यात आली. याची दखल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घ्यावी; अन्यथा शहरातील सर्वच फुटबॉल संघ, तालीम संस्थांना तीव्र आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
आंदोलनाचे नेतृत्त्व शिवसेनेचे पदाधिकारी विजय देवणे यांनी केले. यावेळी अनिकेत घोटणे, अशोक पोवार, बाबूराव चव्हाण (वस्ताद), सुशांत पोवार, प्रथमेश भोसले, श्रीधर पाटील, बाबा पार्टे, श्रीकांत माने, विजय साळोखे (सरदार), प्रथमेश हेरेकर, महादेव पाटील, शुभम मस्कर, अरविंद पोवार, राजेंद्र कुरणे, शरद माळी, सुनील ठोंबरे, सुदेश मगदूम आदींनी आंदोलनात भाग घेतला.
.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.