संस्कृत बोलणारे कुटुंब बातमी

संस्कृत बोलणारे कुटुंब बातमी

Published on

आषाढ मासारंभ विशेष... लोगो
...
15168
...
वयम्‌ कुटुंबजना: संस्कृतम्‌ वदामहा
पती, पत्नी आणि मुलगी साधतात संस्कृतमधून दैनंदिन संवाद
ओंकार धर्माधिकारी : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ ः ‘सिद्धी त्व अध्यायनम करोषिवा?’, ‘श्वेता अद्य पाकं किं कृतवती?’ ही वाक्ये कोणत्या पुस्तकातील नाहीत किंवा नाटकामधीलही नाहीत. हा पती-पत्नी आणी मुलगी यांचा दैनंदिन संवाद आहे. पहिल्या वाक्यात वडील अतुल आपल्या मुलीला अभ्यास केलास का? असे विचारत आहेत. तर दुसऱ्या वाक्यात ते आपली पत्नी श्वेता यांना आज स्वयंपाकात काय बनवले आहे? याबद्दल विचारत आहेत. प्रभावळीकर कुटुंबातील हा रोजचा संवाद आहे. या कुटुंबातील हे तिघे जण एकमेकांशी नेहमीच संस्कृतमध्ये बोलतात.
अतुल प्रभावळीकर हे शिंगणापूर (ता. करवीर) येथे राहतात. ते पौरोहित्य करतात तसेच न्यू मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूल येथे संस्कृतही शिकवतात. ते संस्कृत भारती या संस्कृतचा प्रचार, प्रसार करणाऱ्या संघटनेशी जोडलेले आहेत. त्यांच्या कुटुंबात वडील, पत्नी, मुलगी आणि मुलगा ऋग्वेद असे सदस्य आहेत. मुलगा शालेय अभ्यासक्रमाबरोबरच वेदाभ्यासही करतो. घरामध्ये अतुल त्यांची मुलगी सिद्धी आणि पत्नी श्वेता हे तिघे एकमेकांशी नियमितपणे संस्कृतमध्येच बोलतात.
याबद्दल अतुल सांगतात, ‘संस्कृत ही आपली भाषा आहे. संस्कृतचे संवर्धन करायचे असेल तर त्याची सुरुवात घरातून झाली पाहिजे. संस्कृत भारतीतर्फे जे संभाषण वर्ग घेतले जातात, त्यामध्ये अवघ्या १० ते १५ दिवसांमध्ये व्यक्ती दैनंदिन गरजेपुरते संस्कृत बोलू शकतो. कालांतराने सराव करून संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवता येते. माझी पत्नीदेखील अशाच संभाषण वर्गामधून संस्कृत शिकली. मुलगीही आता १२ वीमध्ये आहे, ती देखील संस्कृतमध्ये बोलते. मुलाला संस्कृत समजते तो बोलण्याचा सराव करतो आहे. आम्ही सारे कुटुंबीय एकमेकांशी संस्कृतमधून बोलतो. बाहेर गेल्यावर ज्यावेळी आम्ही एकमेकांशी संस्कृतमध्ये बोलतो त्यावेळी आसपासचे लोक आमच्याकडे कौतुकाने पाहतात. संस्कृत बोलण्याबद्दल आम्हाला विचारतात. अशा वेळी संस्कृत संवर्धनात आपलाही हातभार असल्याचे समाधान मिळते.’
...
‘संस्कृत भारती’चे प्रयत्न
संस्कृत ही आपली प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे. मात्र सध्या ती व्यवहारात नसल्याने तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे. संस्कृत भारती ही संघटना संस्कृतच्या संवर्धनासाठी प्रयत्न करते. यासाठी संस्कृत संभाषणाचे वर्ग घेतले जातात. तसेच संस्कृत भाषेच्या प्रचार प्रसारासाठी विविध उपक्रमही राबवले जातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.