ॲस्टर आधारतर्फे वृक्षारोपण

ॲस्टर आधारतर्फे वृक्षारोपण

Published on

94618
कोल्हापूर : चित्रनगरी परिसरात एक हजार वृक्ष लागवडीची संकल्पपूर्ती करताना संचालक डॉ. अजय केणी, कर्मचारी आदी.

एक हजार वृक्ष लागवडीचा
‘ॲस्टर आधार’तर्फे उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : अॅस्टर आधार रुग्णालयातर्फे एक हजार वृक्ष लागवडीचा उपक्रम न्यू पॉलिटेक्निक, चित्रनगरी आणि श्री टेंबलाई मंदिर क्रीडांगण परिसरात राबविण्यात आला. टेंबलाई मंदिर परिसरातील क्रीडांगणात येथील सार्वजनिक मंडळाच्या सहकार्याने तसेच गडमुडशिंगी येथील न्यू पॉलिटेक्निक संस्थेच्या परिसरात कर्मचाऱ्यांच्या मदतीने वृक्ष लागवड केली.
वड, आंबा, कडुलिंब, बहुनिया, कांचन, बेल, रेन ट्री वृक्षांची लागवड केली. या झाडांचे पालकत्वही परिसरातील नागरिकांकडून आनंदाने स्वीकारले. चित्रनगरी परिसरामध्ये तेथील कर्मचारी आणि ‘ॲस्टर’तर्फे अॅस्टर व्हॉलेंटियर्सतर्फे वृक्ष लागवडीचा उपक्रम घेतला. व्यवस्थापकीय संचालक डॉ. उल्हास दामले, संचालक डॉ. अजय केणी, डॉ. अमोल कोडोलीकर यांनी मार्गदर्शन केले.
-----------------
कोट
‘अॅस्टर आधार’तर्फे सदैव सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले जातात. जागतिक तापमानवाढीस सामोरे जाताना वृक्ष लागवडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच १००० वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला.
- डॉ. उल्हास दामले
----------------
कोट
शहरात जेथे मोकळ्या जागा आहेत, तेथे वृक्षलागवड करणे हाच प्रमुख उद्देश आहे. देशी वृक्षलागवड करताना औषधी वनस्पती, फुलझाडे, फळझाडांची विविधता असावी. जी पक्षी, फुलपाखरे, वटवाघळे, विविध मधमाशांच्या जीवसृष्टीस उपयुक्त पडतील. अॅस्टर आधार हॉस्पिटलचा उपक्रम कौतुकास्पद आहे.
- सुहास वायंगणकर, पर्यावरण अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.